देश

मोठा दिलासा! 102 दिवसानंतर कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांखाली

नामदेव कुंभार

coronavirus in india, covid-19, latest updates : कोरोना महामारीवर नियमंत्रण मिळवण्यासाठी देशात वेगानं लसीकरण सुरु आहे. लसीकरणामध्ये सोमवारी भारताने अमेरिकेलाही मागे टाकलं आहे. अशातच आणखी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारतामधील कोरोना रुग्णांची संक्या 40 हजारांच्या खाली आली आहे. तब्बल 102 दिवसानंतर देशातील दररोज वाढणारी कोरोना रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. देशाचा रिकव्हरी रेटही वाढला आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात 37 हजार 566 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. 102 दिवसानंतर देशातील दररोजची रुग्णसंख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. देशाचा रिकव्हरी रेटही 96.87 टक्के झाला आहे. सोमवारी 56 हजार 994 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 70 दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळेच उपचाराधीन रुग्णांमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. कोरोनाबाधित रग्णांप्रमाणे मृताची संख्याही दिवसागणिक कमी होत आहे. आरोग्य मंत्रालायने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी देशात 907 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशातील कोरोना स्थिती -

एकूण रुग्ण - Total cases: 3,03,16,897

एकूण कोरोनामुक्त Total recoveries: 2,93,66,601

उपचाराधीन रुग्ण Active cases: 5,52,659

एकूण मृत्यू Death toll: 3,97,637

एकूण लसीकरण - 32.90 कोटी

आतापर्यंत देशात 40 कोटी 81लाख 39 हजार 287 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. सोमवारी देशाभरातून 17 लाख 68 हजाक 008 कोरोना चाचण्या घेतल्याचं आयसीएमआरने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोबाईल हॅक झाल्याची भीती, फार्मसीच्या २० वर्षीय तरुणानं जीवन संपवलं; एकुलत्या एक लेकाच्या मृत्यूनं आई-वडिलांचा आक्रोश मन हेलावणारा

CA Exam Result: 'सीए परीक्षेत सांगलीतील २० जणांचे उल्‍लेखनीय यश'; गेली काही वर्षे विद्यार्थ्यांचे यशात सातत्य

Eco Friendly Bill: ‘महावितरण’च्या ‘गो ग्रीन’ योजनेचा पाच लाख ग्राहकांनी घेतला फायदा

मी पाकिस्तानी लष्कराचा विश्वासू एजंट; 26/11च्या हल्याचा सूत्रधार तहव्वुर राणाचा मोठा खुलासा

Latest Maharashtra News Updates : पुण्यात २६ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त; पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT