lockdown couple in a carriage with an bull indore video viral 
देश

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ आणि बातमी वाचाच...

वृत्तसंस्था

इंदोर (मध्य प्रदेश) : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

देशभरात लॉकडाऊनमुळे अनेकजण हजारो किलोमीटर चालत आपल्या घरी जाताना दिसतात. हजारो किलोमीटर चालल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. उन्हामध्ये अनेकजण आपल्या लहान मुलांना घेऊन चालत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतात. मध्य प्रदेशातील एका बैलगाडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

देशात नांगरण्यासाठी बैल नसल्यामुळे शेतकरी स्वतःला जुपंत असल्याचे छायाचित्रे व व्हिडिओ पाहिले आहेत. पण, घरी जाताना बैलगाडीला एकच बैल असल्यामुळे दुसऱयाबाजूला स्वतःला जुपंल्याचा प्रकार समोर आला आहे. पण, याबाबतची माहिती जाणून घेतल्यानंतर काळजाचा ठोका चुकतो. यावरून किती गंभीर परिस्थिती आहे, हे पाहायला मिळते.

एक दांपत्य मजुरीसाठी इंदोरमध्ये गेले होते. तेथे बैलगाडी विकत घेऊन हमालीचे काम सुरू केले. पण, लॉकडाऊनमुळे काम बंद झाले. शिवाय, जवळ असलेले पैसेही संपले. जवळील अन्नही संपल्यामुळे त्यांनी काळजावर दगड ठेवून एक बैल विकण्याचा निर्णय घेतला. पंधरा हजार रुपयांना विकत घेतलेला एक बैल केवळ पाच हजार रुपयांना विकला. काम नसल्यामुळे गावी परतण्याचा निर्णय घेतला पण एका बैलावर गाडी कशी न्यायची हा प्रश्न उभा राहिला. पण, एका बाजूला बैल आणि दुसऱया बाजूला आपण स्वतःला जुंपून घेण्याचा निर्णय घेत ते गावी निघाले. रस्त्यावरून जात असताना अनेकजण पाहात होते. काही जण मोबाईलमध्ये कैद करत होते. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivraj Motegavkar Son Inquiry : नीट पेपरफुटी प्रकरण; शिवराज मोटेगावकरच्या मुलाची CBI चौकशी, आणखी तीन विद्यार्थ्यांना घेतलं ताब्यात

Electricity Rate: वीज ग्राहकांना मोठा दिलासा! वीजदरात कपात; दिवसा वीज वापरणे स्वस्त होणार, किती दर कमी केले?

NEET पेपरफुटीचं प्रकरण; पुण्यानंतर सीबीआयचं पथक नागपुरात, तीन विद्यार्थ्यांची झाडाझडती़, मोठा मासा गळाला लागणार?

Viral Video: 'अरे हा किती म्हातारा दिसतोय' गोविंदाचं वाढलेलं वय आणि पडलेले दात पाहून नेटकरी म्हणाले...

Latest Marathi News Live Update : काँग्रेसमधील अंतर्गत कलहाला कंटाळून सुधाकर भारसाकळे यांचा तालुकाध्यक्ष पदाचा राजीनामा

SCROLL FOR NEXT