देश

Lockdown : कामगारांकडून प्रवास भाडे घेऊ नका : सर्वोच्च न्यायालय 

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - लॉकडाउनमुळे देशभरातील कामगारांच्या होत असलेल्या होरपळीची सर्वोच्च न्यायालयाने आज गंभीर दखल घेत त्यांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

सध्या हातालाच काम नसल्याने घरी परतणाऱ्या या कामगारांनी बस अथवा रेल्वेतून प्रवास केला तरीसुद्धा त्यांना प्रवासभाडे आकारू नका. विविध ठिकाणांवर अडकून पडलेल्या कामगारांची खाण्यापिण्याची व्यवस्था त्या- त्या राज्यांनी करावी असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्या. अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. ज्या राज्यातून हे मजूर परतत आहेत त्या राज्यानेच प्रवासातील त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करावी. रेल्वेदेखील त्यांना या गोष्टींचा पुरवठा करेल. राज्यांनी या मजुरांची नोंदणी करावी तसेच त्यांना घरी लवकर जाता यावे याची काळजी घ्यावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या संदर्भातील संपूर्ण तपशील संबंधित घटकांसाठी प्रसिद्ध केला जावा असेही आदेशांत म्हटले आहे. 

न्यायालयाची निरीक्षणे व आदेश ... 
१. कामगारांचे रजिस्ट्रेशन, खाण्यापिण्याची सुविधा व त्यांची पाठवणी यांच्या सोयी करण्यात चुका 
२. जे पायी निघाले आहेत, त्यांना राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था तातडीने करावी 
३. रेल्वे स्थानकांवर खाद्यपदार्थांची व्यवस्था राज्यांनी करावी, डब्यामध्ये रेल्वेने जेवणखाण द्यावे 
४. कामगारांची नोंदणी राज्यांनी तातडीने करावी. त्यांना बस अथवा रेल्वे तातडीने पाठविण्याची व्यवस्था करावी 
५. नोंदणी कुठे करणार आणि जेवणखाण कुठे मिळणार यांची माहिती राज्यांनी जाहीर करावी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT