lockdown engagement put off and girls jumps to death 
देश

लॉकडाऊन 1,2,3...; संयम सुटला अन् घेतला निर्णय...

वृत्तसंस्था

अहमदाबाद (गुजरात): लग्न ठरल्यामुळे घरामध्ये आनंद होता. पण, कोरोना आला आणि लॉकडाऊनची घोषणा झाली. लॉकडाऊन एक, दोन, तीन वाढत चालल्यामुळे साखरपुड्याची तारीख पुढे-पुढे जाऊ लागली. यामुळे नैराष्यात गेलेल्या युवतीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना येथे घडली. तेजल सोढा (वय 26) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

तेजलचा विवाह ठरल्यामुळे आनंदात होती. पण, लॉकडाऊनमुळे साखरपुड्याची तारीख पुढे-पुढे जाऊ लागली. यामुळे ती नैराष्यात गेली होती. अखेर तिने आत्महत्येचा निर्णय घेतला आणि इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यामुळे तिच्या कुटुंबियांवर डोंगळ कोसळला आहे.

सोढा कुटुंब हे रमोल भागातील तेजेंद्र क्रिस्टल अपार्टमेंटमध्ये राहात आहे. तेजलचा विवाह ठरल्यानंतर प्रथम 22 मार्चला साखरपुडा करण्याचे ठरले होते. मात्र, लॉकडाऊन घोषणा झाली आणि साखरपुडा पुढे ढकलला गेला. पण, पुन्हा दुसऱया लॉकडाऊन घोषणा करण्यात आली. यामुळे तर ती आणखी नैराष्यात गेली. लॉकडाऊनच्या घोषणा आणि साखरपुड्याची तारीख यामध्ये ताळमेळ बसत नसल्यामुळे तिने आत्महत्येचा निर्णय घेतला.

तेजलच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, साखरपुड्याची तारीख पुढेपुढे जात असल्याने तेजल नैराश्यात गेली होती. कुटुंबियांनी तिला समजावून सांगितले होते पण ती अधिकच काळजी करत होती. तेजलने तिच्या नैराष्येचे कारण कुटुंबियांना सांगितले होते. आई-वडीलांनी तिला समजावण्याचा अनेकदा प्रयत्न केला होता. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT