Lok Nayak medical director is among 3 top hospital officials to test positive 
देश

दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक कोरोना पॉझिटिव्ह

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव दिल्लीत मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता दिल्लीतील सर्वात मोठ्या कोविड रुग्णालयाचे संचालक आणि यूनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठाता यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

काही दिवसांपूर्वीच लोक नायक रुग्णालयाच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डॉ. सुरेश कुमार यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. डॉ. सुरेश कुमार यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न होताच आम्ही संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणं सुरू केलं. जवळपास वरिष्ठ डॉक्टरांसह ३० आरोग्य कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यातच शनिवारी सकाळी आणखी दोन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. प्रशासनानं हॉस्पिटल स्वच्छ करण्यासाठी काही काळ बंद केलं होतं, अशी माहिती रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी दिली. लोक नायक रुग्णालय सध्या कोविड हॉस्पिटल असून तिथे फक्त कोरोना रुग्णावर उपचार केले जात आहेत. सध्या या रुग्णालयात २ हजार बेडची व्यवस्था आहे.

मागील काही दिवसांत दिल्लीत करोनाचा उपद्रव वाढला असून, रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यानं सरकारसमोरील आव्हानात भर पडली आहेत. करोनाचा प्रसार थांबवण्यासाठी दिल्ली सरकार शर्थीचे प्रयत्न करत असतानाच कोविड रुग्णालयाच्या संचालकांना कोरोना झाल्याचे समोर आल्याने दिल्लीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. देशात मुंबईनंतर दिल्लीतील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी चार कलमी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्लीत आरोग्य सेवेत कार्यरत असलेल्या अनेक महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राम मनोहर लोहिया रुग्णालयातील अटल बिहारी वाजपेयी इन्सिस्ट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे अधिष्ठातांना कोरोना झाला होता. त्यानंतर डॉ. राजीव सूद यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनासंबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं नियोजन सूद यांच्याकडे होतं. दिल्लीत आतापर्यंत ६०० आरोग्य कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. दिल्लीतील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सध्या १७,००० इतकी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election : मुंबई महापालिका निवडणुकीआधी मविआत बिघाडी? राज तर सोडा, उद्धव सोबतही आघाडी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याचं वक्तव्य

PAK vs SA 2nd Test: तरुणांनी माती खाल्ली, तिथे 'वयस्कर' खेळाडूने पाकिस्तानची लाज वाचवली! मोडला ९२ वर्षांपूर्वीचा विक्रम, पण...

President Droupadi Murmu : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान जमीन खचली; पोलिसांनी असं काही केलं की...

Latest Marathi News Live Update : लातूर जहीराबाद महामार्गावर शेतकऱ्यांनी मांडली चटणी-भाकरीची पंगत

IND vs AUS 2nd ODI: रोहित निघून जाताच, गंभीर- आगरकरची Yashasvi Jaiswal सोबत चर्चा; उद्या खेळणार का? कोच म्हणाले...

SCROLL FOR NEXT