Lok Sabha adjourned till 2pm amid sloganeering by the Opposition MPs
Lok Sabha adjourned till 2pm amid sloganeering by the Opposition MPs 
देश

Lok Sabha : घोषणाबाजी करणाऱ्यांनी चर्चेत सहभाग घ्यावा, लोकसभेचं कामकाज ठप्प

सकाळ डिजिटल टीम

विरोधी पक्षांतील खासदारांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब

नवी दिल्ली - महागाईसह, इंधन दरवाढ आणि विविध महत्वाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांच्या खासदारांच्या घोषणाबाजीने लोकसभा दणाणून सोडली. त्यामुळे संसदेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले असल्याची महिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली आहे. विरोधी पक्षांतील खासदारांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (Lok Sabha adjourned till 2pm amid sloganeering by the Opposition MPs)

जे सदस्य घोषणाबाजी करत आहेत, त्यांनी चर्चेत सहभाग घ्यावा, असे वक्तव्य लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांनी केलं असून संसदेने काम करावे अशी जनतेची इच्छा असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दोनपर्यंत कामकाज ठप्प राहणार आहे. कालपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन ( Monsoon Session ) सुरू झाले आहे.

अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, देशासाठी हा कालावधी खूप महत्त्वाचा आहे. हा काळ स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आहे. आगामी 15 ऑगस्ट आणि त्यापुढील 25 वर्षांचे विशेष महत्त्व आहे. देश अमृत महोत्सव साजरा करीत आहे तर 25 वर्षांनी देश स्वातंत्र्याची 100 वर्षे साजरी करेल, तेव्हा आपला प्रवास आणि आपण ज्या नवीन उंची गाठू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, संसदेच्या दुसऱ्या दिवशी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकसभेत महागाईविरोधात घोषणाबाजी केली. विरोधी पक्षातील नेत्यांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी संसदेत अनेक मुद्द्यांवरून सत्ताधारी पक्षाला धारेवर धरले आहे. यावेळी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने दुपारपर्यंत हे कामकाज ठप्प ठेवण्याचा निर्णय सभापतींनी घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयारी होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

Accident News : पुण्यात कल्याणीनगर येथे भीषण अपघात, दोघांना चिरडले,अल्पवयीन कारचालक ताब्यात

Sharmistha Raut : "माझ्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायचे"; घटस्फोटाच्या त्या प्रसंगावर व्यक्त झाली शर्मिष्ठा

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT