Campaign From Radio Esakal
देश

Campaign From Radio: लोकसभेचा प्रचार थेट उझबेकीस्तानमधून! प्रचारात टेक्नॉलॉजीचा पहिला वापर डाव्यांनी केला होता..

Campaign From Radio: आपल्या देशात असलेल्या ऑल इंडिया रेडिओवरून राजकीय पक्षांना प्रचार करण्याची मुभा नव्हती. त्यामुळे बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी घराघरात जाऊन प्रचार करण्यास प्राधान्य दिले.

सकाळ वृत्तसेवा

Campaign From Radio: आपण माहितीचा विस्फोट झालेल्या युगात वावरत आहोत. १९९१ च्या जागतिकीकरणानंतर तर विज्ञान व तंत्रज्ञानातील संशोधनाने जगभरातील मानवी जीवन आणखी दिवसेंदिवस सुखकारक होत चालले आहे. विविध भौतिक साधनांची रेलचेल सर्वमाणसांच्या आजूबाजूल आहे. ही साधने त्याच्या दिमतीला अहोरात्र सज्ज आहेत. मात्र भारतात १९५१-५२ साली झालेली पहिली निवडणूक अत्यंत कमी व अपुर्या साधनसंपत्तीत पार पडली.

आज समाजमाध्यमे, वृत्तवाहिन्या, दूरचित्रवाहिन्या, यूट्यूब चॅनेल्स आदींनी आपले भावविश्व जखडून ठेवलेल्या जमान्यात आपल्याला त्याकाळच्या प्रचार माध्यमांची फारशी माहिती नसेल. त्याकाळी आपल्या राजकीय पक्षांनी त्यांचा प्रचार कसा केला असेल, याविषयीची उत्सकता नक्कीच असेल.

अत्याधुनिकतेशी कायम फटकून वागणार्या डाव्या पक्षांनी पहिल्या निवडणुकीत आपला प्रचार चक्क मास्को रेडिओवरून केला होता, हे वाचून आपणास आश्चर्य वाटेल. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचा जोरदार गाजावाजा होता. विरोधकांचा मागमूसही कुठे दिसायचा नाही. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडेही प्रचाराची वाणवा होती.

त्यांच्या साम्यवादी विचारसरणीचे प्रमुख केंद्र असलेल्या रशियातही साम्यवादी विचारांची राजवट होती. त्यामुळे भाकपने आपल्या पक्षाचा निवडणूक प्रचार थेट मास्को रेडिओवरून केला. तो ताश्कंदमधील त्यांच्या केंद्रावरून भारतातील लगतच्या प्रदेशात प्रसारित करण्यात आला. अशारितीने भारतीय निवडणुकीत रेडिओवरून प्रचार करण्याची संधी मिळणारा भाकप हा पहिला राजकीय पक्ष ठरला. त्यावेळी आपल्या देशात असलेल्या ऑल इंडिया रेडिओवरून राजकीय पक्षांना प्रचार करण्याची मुभा नव्हती. त्यामुळे बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी घराघरात जाऊन प्रचार करण्यास प्राधान्य दिले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खुल्या जागेत कुर्बानी होऊ देणार नाही; धर्माच्या नावाखाली कत्तल सहन करणार नाही, बकरीदपूर्वी भाजप नेत्याचे BMC ला पत्र

Retired Teacher Donation: सेवानिवृत्त शिक्षिकेची एक कोटींची देणगी; विजयाताई वैद्यांचा सैनिकांच्या कल्याणासाठी प्रेरणादायी त्याग

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

SCROLL FOR NEXT