Prajwal Revanna Defeated from Hassan esakal
देश

Lok Sabha Election 2024: कथित सेक्स स्कँडल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा पराभूत! मतदारांनी दिला दणका

Prajwal Revanna Defeated from Hassan: प्रज्वल रेवण्णा सध्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष टीमच्या ताब्यात आहे. जर्मनीवरुन बेंगळुरीच्या विमानतळावर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कथित सेक्स टेप प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवण्णा याचा कर्नाटकातील हसन मतदारसंघातून पराभव झाला आहे. प्रज्वल रेवण्णा सध्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष टीमच्या ताब्यात आहे. जर्मनीवरुन बेंगळुरीच्या विमानतळावर आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. लोकसभा निवडणुकीनंतर दोन दिवसांनी त्याने जर्मनीला पलायन केले होते.

कर्नाटकच्या २८ जागांचे निकाल समोर येऊ लागले आहेत. भाजपने याठिकाणी चांगली कामगिरी केली आहे. मात्र, सगळ्यांचे लक्ष हसन मतदारसंघाकडे लागले होते. याठिकाणी जेडीएसचे उमेदवार आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा हे मैदानात होते. तो सेक्स स्कँडल प्रकरणात अडकले आहे. त्यामुळे जनता कोणाच्या बाजुने कौल देईल याबाबत उत्सुकता होती

प्रज्वल रेवण्णा याने अनेक महिलांचे लैंकिग शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणात २००० सेक्स टेप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेवण्णा जर्मनीला पळून गेला होता. पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस जारी केली होती. कुटुंबाच्या आव्हानंतर रेवण्णा ३५ दिवसानंतर जर्मनीहून भारतात परतला. ६ जूनपर्यंत तो एसआयटीच्या ताब्यात असणार आहे.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेडीएसने कर्नाटकमध्ये हसनची एकमेव जागा जिंकली होती. रेवण्णा याने भाजपचे उमेदवार ए मंजू यांचा पराभव केला होता. त्याने मंजू यांचा १,४१,२२४ मतांनी पराभव केला होता. कधीकाळी हसन लोकसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. त्यानंतर तो देवेगौडा कुटुंबाचा बालेकिल्ला बनला. १९९९ सोडून १९९१ ते २०१९ पर्यंत या मतदारसंघातून देवेगौडा आणि त्यांच्या कुटुंबाने याठिकाणी प्रतिनिधित्व केले आहे. एच डी देवेगौडा एकटे या मतदारसंघातून पाचवेळा जिंकले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup Schedule : प्रतीक्षा संपली! वन डे वर्ल्ड कप २०२७ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; India vs Pakistan सामना कधी व केव्हा; जाणून घ्या टीम इंडियाचे टाईमटेबल

HDFC Bank: एचडीएफसी बँकेला मिळाले नवे प्रमुख! अनूप बागची सांभाळणार एमडी आणि सीईओ पदाची धुरा

ICC ODI World Cup 2027 India Fixture: India vs Pakistan एकदा नव्हे, तर तीनवेळा भिडणार, जाणून घ्या कधी व कुठे खेळणार...

Sugar Price Hike : साखरेचे दर पुन्हा वाढणार की कमी होणार? केंद्र सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय; व्यापाऱ्यांची कोंडी होणार

Crop Panchnama Maharashtra : दुष्काळी तालुक्यांत सुट्टीच्या दिवशीही पीक पंचनामे करा; ग्रामसेवक, तलाठ्यांना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तीन दिवसाच्या सुट्ट्या रद्द

SCROLL FOR NEXT