देश

Loksabha election 2024 : पत्नीसोबत आलेल्या भाजप उमेदवाराने EVM मशिनची केली तोडफोड; पोलिसांनी केली अटक, नेमकं काय घडलं?

न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, प्रशांत जगदेव हे आपल्या पत्नीसोबत बूथवर पोहोचले होते. परंतु ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने त्यांना मतदान करण्यासाठी वेटिंग करावी लागत होती. अधिकारी म्हणाले की, त्यांच्यात आणि पीठासीन अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे त्यांनी ईव्हीएम मशिन खाली खेचलं आणि ते फुटलं.

संतोष कानडे

नवी दिल्लीः ओडिशातल्या खुर्दा येथे एका भाजप उमेदवाराने ईव्हीएम मशिनची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे त्या भाजप उमेदवाराला पोलिसांनी अटक केलीय. ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने त्यांनी वोटिंगसाठी वेळ लागत होता. खूप वेळ वाट बघितल्यानंतर त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी मशिनची तोडफोड केली.

चिल्काचे भाजप आमदार प्रशांत जगदेव यांना यावेळी भाजपने खुर्दा विधानसभेच्या जागेवरुन मैदानात उतरवलं होतं. ओडिशामध्ये लोकसभेसह विधानसभेच्या निवडणुकाही होत आहेत. ही घटना शनिवारी बेगुनिया विधानसभा मतदारसंघातल्या बोलागाड विभागातल्या कँरिपटना बूथमध्ये झाली.

न्यूज एजन्सी पीटीआयच्या माहितीनुसार, प्रशांत जगदेव हे आपल्या पत्नीसोबत बूथवर पोहोचले होते. परंतु ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याने त्यांना मतदान करण्यासाठी वेटिंग करावी लागत होती. अधिकारी म्हणाले की, त्यांच्यात आणि पीठासीन अधिकाऱ्यामध्ये वादावादी झाली. त्यामुळे त्यांनी ईव्हीएम मशिन खाली खेचलं आणि ते फुटलं.

पोलिस अधीक्षक अविनाश कुमार म्हणाले की, पीठासीन अधिकाऱ्याच्या तक्रारीवरुन आमदारांना अटक करण्यात आली. लोकप्रतिनिधी अधिनियमाशिवाय जगदेव यांच्यावर आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोर्टाने प्रशांत जगदेव यांना न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं आहे. सध्या ते खुर्दा जेलमध्ये आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT