Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha election 2024 : निवडणूक आयोगाकडून पाच टप्प्यातील मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी जाहीर

मतदान झाल्याच्या अनेक दिवसानंतर आकडेवारीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केले होते. दुसरीकडे ​निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी चुकीची माहिती योजनाबद्ध रित्या फैलावली जात असल्याचा आरोप यानिमित्ताने आयोगाने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः मतदानाची टक्केवारी उशिराने जाहीर केली जात असून यात मोठी गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच टप्प्यातील मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी त्वरित संकेतस्थळावर टाकण्याच्या विनंतीची याचिका अलिकडेच सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यास विलंब केला जात आहे. मतदान झाल्याच्या अनेक दिवसानंतर आकडेवारीत पाच ते सहा टक्क्यांनी वाढ झाली आहे, असे गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केले होते. दुसरीकडे ​निवडणूक आयोगाने हे आरोप फेटाळून लावले होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची मतदारसंघ निहाय आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्यासाठी चुकीची माहिती योजनाबद्ध रित्या फैलावली जात असल्याचा आरोप यानिमित्ताने आयोगाने केला आहे.

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी

पहिला टप्पा : भंडारा — गोंदिया - ६७.०४ टक्के, चंद्रपूर - ६७.५५ टक्के, गडचिरोली — चिमूर - ७१.८८ टक्के, नागपूर - ५४.३२, रामटेक - ६१.०१

दुसरा टप्पा : अकोला - ६१.७९ टक्के, अमरावती - ६३.६७ टक्के, बुलडाणा - ६२.०३ टक्के, हिंगोली - ६३.६४ टक्के, नांदेड - ६०.९४ टक्के, परभणी - ६२.२६ टक्के, वर्धा - ६४.८५ टक्के, यवतमाळ—वाशिम ६२.८७ टक्के
----------
तिसरा टप्पा : बारामती - ५९.५० टक्के, हातकणंगले - ७१.११ टक्के, कोल्हापूर - ७१.६९ टक्के, लातूर - ६२.५९ टक्के, माढा - ६३.६५ टक्के, उस्मानाबाद - ६३.८८ टक्के, रायगड - ६०.५१ टक्के, रत्नागिरी—सिंधुदूर्ग - ६२.५२ टक्के, सांगली - ६२.२७ टक्के, सातारा ६३.१६ टक्के, सोलापूर - ५९.१९ टक्के

चौथा टप्पा : नगर - ६६.६१ टक्के, औरंगाबाद - ६३.०३ टक्के, बीड - ७०.९२ टक्के, जळगाव - ५८.४७ टक्के, जालना - ६९.१८ टक्के, मावळ - ५४.८७ टक्के, नंदूरबार - ७०.६८ टक्के, पुणे - ५३.५४ टक्के, रावेर - ६४.२८ टक्के, शिर्डी - ६३.०३ टक्के, शिरुर - ५४.१६ टक्के
-----------
पाचवा टप्पा : भिवंडी - ५९.८९ टक्के, धुळे - ६०.२१ टक्के, दिंडोरी - ६६.७५ टक्के, कल्याण - ५०.१२ टक्के, उत्तर मुंबई - ५७.०२ टक्के, उत्तर मध्य मुंबई - ५१.९८ टक्के, ईशान्य मुंबई - ५६.३७ टक्के, वायव्य मुंबई - ५४.८४ टक्के, दक्षिण मुंबई - ५०.०६ टक्के, दक्षिण पश्चिम मुंबई - ५३.६० टक्के, नाशिक - ६०.७५ टक्के, पालघर - ६३.९१ टक्के आणि ठाणे - ५२.०९ टक्के

संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न, मात्र या खेळाचे सत्य बाहेर आणू - राजीव कुमार

दरम्यान, मतदानाच्या आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून या खेळाचे सत्य आम्ही बाहेर आणू, असे ​मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फॉर्म १७ - सी चा डेटा तसेच मतदारकेंद्र निहाय आकडेवारी संकेतस्थळावर टाकण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले जावेत, अशा विनंतीच्या याचिकेवर निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला होता, यावर प्रतिक्रिया विचारली असता राजीव कुमार यांनी वरील उत्तर दिले.

संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे, हे आम्हाला माहित आहे. हा कसला खेळ आहे, हे नक्कीच आम्ही समोर आणू. लोकांची कशा पध्दतीने दिशाभूल सुरु आहे, ते चव्हाट्यावर आणले जाईल, असे कुमार म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये मतदानाला मिळालेल्या प्रतिसादामुळे आम्ही उत्साहित आहोत, असे त्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. जम्मू काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया सुरु केली जाईल. याठिकाणी लोकशाही प्रक्रियेची मूळे घट्ट होत आहेत, ही निश्चितपणे समाधानाची बाब आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजारात घसरण! Tata आणि Reliance ला फटका; ICICI Bank मात्र तेजीत

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Latest Marathi News Live Update : पुण्यात विद्यार्थ्यांसाठी स्काऊट-गाईड उन्हाळी शिबिर; ५५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT