Loksabha Election Esakal
देश

Loksabha Election: प्रतीक्षा संपली! लोकसभा निवडणुकीच्या तारखा उद्या जाहीर होण्याची शक्यता, निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद

Loksabha Election: निवडणूक आयोग शनिवारी दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखा जाहीर करेल. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

Loksabha Election: निवडणूक आयोग शनिवारी दुपारी ३ वाजता लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या तारखा जाहीर करेल. यासोबतच काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तारखाही जाहीर केल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ते थेट प्रक्षेपित केले जाईल.

लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात सुरू असलेली बैठक संपली आहे. ही बैठक सुमारे ४५ मिनिटे चालली. नवनियुक्त आयुक्तांचे औपचारिक स्वागत झाल्यानंतर पूर्ण आयोगाच्या बैठकीला सुरुवात झाली.

गेल्या वेळी सात टप्प्यांत झाल्या होत्या निवडणुका

२०१९ मध्ये लोकसभा निवडणुका सात टप्प्यात पार पडल्या. गेल्या वेळी निवडणूक आयोगाने १० मार्च रोजी तारखा जाहीर केल्या होत्या. पहिल्या टप्प्याचे मतदान ११ एप्रिलला तर शेवटच्या टप्प्यासाठी १९ मे रोजी मतदान झाले. 23 मे रोजी निकाल लागला. त्या निवडणुकीच्या वेळी देशात ९१ कोटींहून अधिक मतदार होते, त्यापैकी ६७ टक्के मतदारांनी मतदान केले होते.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने २०१४ च्या तुलनेत मोठा विजय मिळवला होता. २०१४ मध्ये भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ मध्ये ३०३ जागा जिंकल्या होत्या. तर एनडीएला ३५३ जागा मिळाल्या होत्या. भाजपला ३७.७% पेक्षा जास्त मते मिळाली होती, तर NDA ला ४५% मते मिळाली होती. काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT