Lok Sabha Election 2024 Jairam Ramesh on PM face in INDIA Alliance Congress Rahul Gandhi  
देश

Lok Sabha Elections 2024 : जिंकल्यास इंडिया आघाडीकडून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश यांनी दिलं उत्तर

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे अखेरचे दोन टप्पे शिल्लक आहेत. तसेच येत्या ४ जून रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील.

रोहित कणसे

Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे अखेरचे दोन टप्पे शिल्लक आहेत. तसेच येत्या ४ जून रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. जर विरोधी पक्षांना बहुमत मिळाले तर त्यांच्याकडून पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असेल याबद्दल सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याबद्दल काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांना प्रश्न विचारण्यात आला की विरोधकांकडून राहुल गांधी पंतप्रधान पदाचा चेहरा असतील का? यावर त्यांनी एक प्रक्रियेअंतर्गत पंतप्रधान पदाचा चेहरा जाहीर केला जाईल असे उत्तर दिले आहे.

एएनआयशी बोलताना काँग्रेस नेते जयराम रमेश म्हणाले की, आपल्या देशात ही व्यक्तींमधील सौंदर्य स्पर्धा नाही. आम्ही पक्ष-आधारित लोकशाही आहोत. कोणत्या पक्षाला किंवा आघाडीला जनादेश मिळेल हा प्रश्न आहे. व्यक्तीला इतकं महत्व नाही, पक्षांना बहुमत मिळतं आणि पक्ष आपला नेता निवडतो आणि तो नेता पंतप्रधान होतो असेही जयराम रमेश म्हणाले.

१३ मे २००४ रोजी काँग्रेस पक्ष आणि घटक पक्षांना बहुमत मिळालं, १७ मे म्हणजे चार दिवसांनंतर पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून डॉ. मनमोहन सिंह यांचे नाव जाहीर करण्यात आले. नाव जाहीर चार दिवस लागले. यावेळेस चार दिवस पण लागणार नाहीत, दोन दिवसांत नाव जाहीर केले जाईल असेही जयराम रमेश यावेळी म्हणाले.

खासदार एकमेकांना भेटतील आणि खासदार पंतप्रधान पदाचा उमेदवार निवडतील. ही एक प्रक्रिया असते. आम्ही शॉर्टकटवर विश्वास ठेवत नाहीत. ते मोदींच्या कामाची पद्धत असेल, आम्ही अहंकारवादी नाहीत. आमच्या इंडिया आघाडीचे आकडे येतील, सर्व पक्षांचे आकडे आल्यानंतर स्पष्ट जनादेश येईल. त्यानंतर सर्व नवनिर्वाचित खासदार एकत्र येतील आणि त्यानंतर दोन दिवस सुद्धा लागणार नाहीत, काही तासांमध्ये देखील पंतप्रधानांचे नाव जाहीर केले जाऊ शकते. यावेळीही सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवारच पंतप्रधान बनेल, २००४ मध्येही तसंच झालं होतं असेही जयराम रमेश यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Provident Fund: PF धारकांसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय! 31 लाख खातेधारकांना काही न करता मिळणार 11,000 कोटी; जाणून घ्या कधी?

Marriage Fraud: विवाहापूर्वी सांगितला ५० हजार पगार; प्रत्यक्षात जावयाला ७००० रुपयेच, साेलापूरात जुळ्या बहीणांनी जीवे मारण्याचा प्रयत्न, काय घडलं!

Latest Marathi News Live Update : शिंदखेडा-विरदेल मार्गावर कापसाने भरलेला ट्रॅक्टर उलटला

Fraud Case : ए. एस. ट्रेडर्स व उपकंपनीच्‍या; पलूसमधील संचालकाला अटक मुख्य संशयित सुभेदारने केली होती नेमणूक

Ladki Bahin Yojana: ई-केवायसी केलेल्या महिलांना चालू महिन्याचेच पैसे; नोव्हेंबर, डिसेंबरच्या हप्त्यापासून लाडक्या बहिणी वंचित

SCROLL FOR NEXT