Lok Sabha Election 2024  esakal
देश

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Labor Laws: एखादी कंपनी सुट्टी देत नसेल तर काय करायचे?

सकाळ डिजिटल टीम

Lok Sabha Election 2024 :

महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे मतदानासाठी लोकांची लगबग सुरू आहे. अशात मतदानादिवशी सकाळी मतदान करून सुट्टीवर जाण्याचा प्लॅनही लोक ठरवत आहेत.

लोकसभा निवडणुकीसाठी 2024 च्या पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पार पडले आहे. लोकसभा निवडणुका एकूण 7 वेगवेगळ्या टप्प्यात होणार आहेत. त्यानंतर ४ जून रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.

वर्षभरात अनेक सार्वजनिक सुट्ट्या असतात. काही मोठे विकेंडसुद्धा असतात. पण या सगळ्या सुट्ट्यांमध्ये मतदानाची सुट्टीही फिक्स असते. कर्मचारी सरकारी असो वा खासगी त्याला मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळते. पण ही सुट्टी देणं कंपनीला बंधनकारक आहे का? (Lok Sabha Election 2024)

एखादा व्यक्ती मतदान करून कामावर जाऊ शकत असेल तर त्याला सुट्टीची आवश्यकता आहे का?  कंपनीमध्ये कितीही वर्कलोड असला तरी मतदानाच्या दिवशी सुट्टी द्यावीच लागते, यामागील कारण काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

मतदानाच्या सुट्टीबद्दल कायदा काय सांगतो

संविधानानुसार कोणत्याही नागरिकाला मतदानाचा अधिकार नाकारता येत नाही. त्यामुळे मतदान करण्याचा हक्क प्रत्येकाला बजावावा लागतो. लोकप्रतिनिधी कायदा १९५१, (RP) नुसार. प्रत्येक कंपनीने मतदान होत असलेल्या भागात मतदानाचा दिवस सुट्टी म्हणून घोषित करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार, मतदानाच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना पगारी रजा द्यावी आणि त्या दिवसाचा पूर्ण पगार कंपनीने द्यावा लागतो.

काही मतदारांच्या बाबतीत मतदान गावी असेल तर तिकडे रात्रभर प्रवास करून जावे लागते. आणि मतदान करून पुन्हा कामाच्या ठिकाणी यावे लागते. तेव्हा, या सगळ्या प्रवासाला सुट्टी लागते. त्यामुळेच कंपनीने सुट्टी जाहीर करावी लागते.

एखादी कंपनी सुट्टी देत नसेल तर...

ECI किंवा त्यांनी नियुक्त केलेल्या प्राधिकरणाशी संपर्क साधू शकतात. तुम्ही तक्रार केली तर संबंधिक कंपनीवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे, कंपनीही अडवणूक न करता सुट्टी जाहीर करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranjeet Kasale Arrest : वादग्रस्त बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासलेला अटक, गुजरात पोलिसांची लातूरमध्ये मध्यरात्री कारवाई

Latest Marathi News Live Update : वसुबारसपासून दीपोत्सवाला सुरुवात; आज अभ्यंगस्नानाचा मुख्य दिवस

Ashok Kumar passed Away: १९७१ च्या रणसंग्रामातील नायक हरपला; वीर चक्र विजेते, कमांडर अशोक कुमार यांचे निधन

दिवाळीत दिल्ली-NCRमध्ये हवा बनली विषारी, श्वास घेणंही कठीण; AQI ४००च्या वर, १२ कलमी अ‍ॅक्शन प्लॅन लागू

Solapur Accident: इंचगावजवळ अपघातात एक ठार, एक जखमी; पिकअपची दुचाकीला मागून धडक; राष्ट्रीय महामार्गावर घटना..

SCROLL FOR NEXT