देश

Rahul Gandhi : ''आता लग्न करावंच लागेल'' रायबरेलीत प्रचार करताना राहुल गांधी असं का बोलले?

संतोष कानडे

Loksabha election 2024 : रायबरेली लोकसभा मतदारसंघात राहुल गांधींना प्रचारादरम्यान एक वेगळाच अनुभव आला. थेट लोकांनीच त्यांना लग्न कधी करणार, असं विचारलं. त्यावर राहुल यांनीही तितक्याच मोकळेपणाने उत्तर दिलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राहुल गांधी हे रायबरेलीमध्ये जोरदार प्रचार करत आहेत. सोमवारी ते पुन्हा रॅलीसाठी रायबरेलीमध्ये दाखल झाले होते. जेव्हा राहुल गांधींचं संबोधन संपलं तेव्हा जमलेल्या गर्दीने त्यांना जोरजोरात प्रश्न विचारणं सुरु केलं.

गर्दीने एकच प्रश्न वारंवार उपस्थित केला. 'तुम्ही लग्न कधी करणार?' असा प्रश्न त्यांना विचारण्यात येत होता. त्यावर राहुल गांधींनी जवळच्या लोकांना विचारलं, की लोक काय विचारत आहेत. त्यानंतर त्यांनी स्वतःच उत्तर दिलं. ''आता लवकरच लग्न करावं लागेल'' या त्यांच्या उत्तराने उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

दरम्यान, केरळच्या वायनाड मतदारसंघाचे खासदार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे दोन लोकसभा मतदारसंघांमधून उभे आहेत. त्यांच्या वायनाडच्या जागेवर आधीच मतदान पार पडलं आहे. त्याशिवाय उत्तर प्रदेशातल्या रायबरेली मतदारसंघातूनही ते उमेदवार आहेत. रायबरेलीमध्ये २० मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इस्रायल इराण युद्धाचा थेट परिणाम, कच्च्या तेलाच्या दराचा भडका; पेट्रोल-डिझेल महाग होणार?

Iran vs Israel युद्ध आणखी भडकणार! इराणला पाठिंबा देत हिजबुल्लाहचे इस्रायलवर हल्ले, इस्रायलचा लेबनॉनच्या राजधानीतही विध्वंस

Minor Sexual Assault Case : सांगली हादरली! अल्पवयीन मुलीवर 5 नराधमांकडून सलग 2 वर्षे लैंगिक अत्याचार; जन्मदात्या आईने परराज्यात जाऊन मुलीचा केला गर्भपात

Latest Marathi News Live Update : मिरज शहरात दोन दिवस पाणी पुरवठा राहणार बंद

मोठी बातमी! ५ किलोमीटरमधील कमी पटाच्या शाळांचे दुसऱ्या शाळेत होणार समायोजन; शासनाच्या ‘या’ निर्णयामुळे राज्यातील २५० शाळांचे भवितव्य अंधारात

SCROLL FOR NEXT