देश

PM Modi : ध्यानमुद्रेत बसले पीएम मोदी; पुढचे ४५ तास अन्नाचा कणही घेणार नाहीत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी सायंकाळी तामिळनाडूत पोहोचले. तिथल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये त्यांचं ध्यान सुरु झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी ते ध्यानमुद्रेत बसले. आता ते ४५ तास त्याच ध्यान अवस्थेत राहणार आहेत. यापूर्वी पंतप्रधानांनी भगवती अम्मन मंदिरात जावून पूजाअर्जा केली.

सुमारे तीन महिने सुरू असलेला लोकसभा निवडणुकीचा प्रचार संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी तमिळनाडूमधील कन्याकुमारी येथे गुरुवारी संध्याकाळी दाखल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येथील विवेकानंद शिलास्मारकावर सुमारे ४५ तासांचे मौनव्रत धारण करणार असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदी प्रचार संपवून वाराणसी येथून तिरुअनंतपुरम येथे दाखल झाले, त्यानंतर ते हेलिकॉप्टरने कन्याकुमारी येथे पोहोचले. विवेकानंद शिलास्मारक येथे जाण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी येथील भगवती अम्मन मंदिरात पूजन केले. यावेळी मंदिरातील पुजाऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. त्यानंतर विशेष बोटीने पंतप्रधान मोदी विवेकानंद शिलास्मारकावर पोहोचले. येथे त्यांनी स्वामी विवेकानंद याच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर काही काळ विश्रांती घेऊन पंतप्रधान मोदी हे ध्यानाला बसले.

स्वामी विवेकानंद ज्या ठिकाणी ध्यानाला बसले होते त्या ठिकाणी पंतप्रधान मोदी सुमारे दोन दिवस अखंड ध्यान करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे एक जून रोजी त्याचे मौनव्रत पूर्ण करून दिल्लीला रवाना होणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर कन्याकुमारी येथे कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री तमिळनाडूमध्ये

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विवेकानंद शिलास्मारक येथे दोन दिवसांच्या मौनव्रतासाठी आणि ध्यानधारणेसाठी दाखल झाले असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील गुरुवारी तमिळनाडूमधील पुदुकोट्टई येथील थिरुमयम किल्ल्यावरील वैष्णव आणि शैव मंदिरांना भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT