rahul gandhi  Sakal
देश

Rahul Gandhi : टेम्पो भरुन पैशांच्या आरोपांना राहुल गांधींचं उत्तर; मोदींना उद्देशून म्हणाले, वैयक्तिक अनुभव...

''अदानी-अंबानींकडे सीबीआय, ईडी पाठवा आणि त्यांची चौकशी करा.. घाबरु नका. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा चालक कोण आहे हे देशाला माहिती आहे, असंही राहुल गांधी म्हणाले.''

संतोष कानडे

नवी दिल्लीः राहुल गांधींनी अदानी-अंबानींना शिव्या देणं का थांबवलं? असा सवाल उपस्थित करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींकडे पैशांचा टेम्पो पोहोच झाला का? असा आरोप केला होता. त्याला राहुल गांधींनी उत्तर दिलं असून पंतप्रधान हे स्वतःच्या अनुभवातून बोलत आहेत, असं म्हटलं आहे.

काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?

''तुम्ही पाहिलं असेल की गेल्या पाच वर्षांपासून काँग्रेसचे शहजादे सकाळी उठल्याबरोबर जपमाळ जपायला सुरुवात करत होते. जेव्हापासून त्यांचे राफेल प्रकरण शांत झाले आहे. तेव्हापासून त्यांनी नवीन जपमाळ करण्यास सुरुवात केली. पाच वर्षे एकच जपमाळ जपायची. पाच उद्योगपती-पाच उद्योगपती. मग हळूच म्हणू लागले अंबानी-अदानी. मात्र निवडणुका जाहीर झाल्यापासून त्यांनी अंबानी-अदानींना शिव्या देणे बंद केले.

या निवडणुकीत अंबानी-अदानी यांच्याकडून किती पैसा जमा केला? तुम्ही काळा पैसा किती पोती घेतला? टेम्पो भरून नोटा काँग्रेसपर्यंत पोहोचल्या आहेत का? काय डील झाली. तुम्ही रातोरात अंबानी-अदानींना शिव्या देणे बंद का केले. याचा अर्थ, भरलेल्या टेम्पोमध्ये तुम्हाला काही चोरीचा माल सापडला आहे. याचे उत्तर देशाला द्यावे लागेल, असं मोदी म्हणाले होते.

राहुल गांधींचा पलटवार?

पंतप्रधानांच्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले की, मोदीजी तुम्ही घाबरला आहात का? अदानी आणि अंबानींबद्दल तुम्ही बंद दाराआड चर्चा करता, परंतु आता तुम्ही पहिल्यांदाच त्यांच्याबद्दल सार्वजनिकपणे बोलला आहात. ते टेम्पोमध्ये पैसे देतात ही तुम्हाला माहिती आहे, हा तुमचा वैयक्तिक अनुभव आहे का? असा सवाल राहुल गांधींनी उपस्थित केला.

व्हिडीओमध्ये राहुल पुढे म्हणतात, अदानी-अंबानींकडे सीबीआय, ईडी पाठवा आणि त्यांची चौकशी करा.. घाबरु नका. भाजपच्या भ्रष्टाचाराच्या टेम्पोचा चालक कोण आहे हे देशाला माहिती आहे, असंही ते पुढे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT