देश

PM Narendra Modi : नरेंद्र मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळलं; दहापेक्षा जास्त जखमी

संतोष कानडे

Lok sabha election 2024 : मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान अपघात घडला आहे. रस्त्याच्या कडेला स्वागतासाठी उभं केलेलं स्टेज कोसळल्याने दहापेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचं सांगितलं जातंय. जखमींमध्ये महिला, पत्रकार आणि लहान मुलांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जबलपूर येथे रोड शो केला. या कार्यक्रमासाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले होते. गर्दीमध्ये रस्त्यावरील एक स्टेज कोसळल्याची घटना घडली आहे. यामध्ये कुणालाही गंभीर इजा झालेली नाही.

पंतप्रधानांची एक झलक पाहण्यासाठी गरजेपेक्षा जास्त लोक स्टेजवर चढले होते. पोलिसांनी सांगूनही लोकांनी ऐकलं नाही. त्यामळे स्टेज कोसळलं आणि लोक जखमी झाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जबलपूरमध्ये झालेल्या रोड शोचे फोटो आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहेत. ते म्हणतात, आज जबलपूरमध्ये रोड शो संपन्न झाला. येथील माझ्या कुटुंबियांचा उत्साह आणि जल्लोष पाहुन माझ्या तिसऱ्या टर्मला आशीर्वाद मिळतील, हे निश्चित आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आणि रस्त्यांसह येथे आम्ही काम उभं केलं आहे. त्यामुळे जबलपूरच्या विकासाला चालना मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT