Lalu Prasad Yadav esakal
देश

Loksabha election 2024 : लालूप्रसाद यादवांच्या दोन्ही कन्यांना तिकीट; 'राजद'च्या उमेदवारांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा

पाटणाः राष्ट्रीय जनता दलाने महागठबंधनमधील घटक पक्ष म्हणून बिहारमधील लोकसभेच्या २३ जागांपैकी एक वगळता उर्वरित जागांवरील उमेदवारांची अधिकृत घोषणा केली. पक्षाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या कन्या रोहिणी आचार्य आणि मिसा भारती यांचाही या उमेदवारांत समावेश आहे.

पक्षाचे बिहार प्रदेशाध्यक्ष जगदानंदसिंह यांनी मंगळवारी (ता.९) रात्री उशिरा जारी केलेल्या निवेदनानुसार, रोहिणी आचार्य सारन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. याच मतदारसंघातून लालूप्रसाद यादव यांनी अनेकवेळा विजय मिळविला होता. चारा गैरव्यवहारात दोषी ठरेपर्यंत म्हणजे २०१३ पर्यंत ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.

त्याचप्रमाणे, सध्या राज्यसभेचे खासदारपद दुसऱ्यांदा भूषविणाऱ्या लालूप्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ कन्या मिसा भारती पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. महागठबंधनमधील जागावाटपानुसार राजद बिहारमधील ४० लोकसभा मतदारसंघांपैकी २६ जागा लढत असून उर्वरित नऊ जागा काँग्रेस व पाच जागा डाव्या पक्षांना सोडण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात बिहारचे माजी मंत्री मुकेश साही यांच्या विकसनशील इन्सान पक्षाला राजदने आपल्या कोट्यातून तीन जागा देण्याचा करार केला होता. त्यानुसार, या जागा वगळता उर्वरित २३ पैकी २२ जागांवरील उमेदवार राजदने जाहीर केला.

राजदचे प्रमुख उमेदवार

रोहिणी आचार्य (सारण)

मिसा भारती (पाटलीपुत्र)

सुधाकर सिंह (बक्सार)

अली अश्रफ फातमी (मधुबनी)

सुरेंद्र प्रसाद (जेहानाबाद)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

‘हाफ सीए’ सीझन २: सीए बनायची स्वप्न पाहणाऱ्या तरुणांची कहाणी आता ओटीटीवर; ट्रेलर प्रदर्शित

Gold-Silver Rate Today: सोन्याचा दर खाली, चांदीतही घसरण! तुमच्या शहरातील ताजे भाव तपासा

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

SCROLL FOR NEXT