Muslims in Parliament 
देश

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

Muslim candidates in Lok Sabha Election: ४ जून रोजी मतमोजणी होईल अन् देशाच्या जनतेचा कौल काय होता हे स्पष्ट होईल.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. देशात एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडत आहे. ४ जून रोजी मतमोजणी होईल अन् देशाच्या जनतेचा कौल काय होता हे स्पष्ट होईल. मात्र, या निवडणुकीमध्ये मुस्लिमांना कमी प्रतिनिधित्व मिळाल्याचं समोर येत आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये कमी मुस्लिम उमेदवारांना लोकसभेचं तिकीट मिळालं आहे.

काँग्रेस, समाजवादी पक्षांना मुस्लिमांच्या जवळचे पक्ष मानले जाते. पण, या दोन्ही पक्षांकडून २०१९ च्या तुलनेत २०२४ मध्ये मुस्लिम उमेदवार कमी देण्यात आले आहेत. देशात जवळपास २० कोटी मुस्लिम राहतात, पण त्यांचे विधानसभा आणि लोकसभेतील प्रतिनिधीत्व खूप कमी आहे. त्यामुळे मुस्लिमांची लोकसंख्या वाढत असल्याची ओरड होत असली तरी त्यांना प्रतिनिधीत्व मिळणे कमी झाले आहे.

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, आरजेडी, एनसीपी आणि सीपीआय (एम) या पक्षांनी ७८ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. ही संख्या ३७ ने कमी आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये विरोधकांनी ११५ मुस्लिम उमेदवारांना संधी मिळाली होती. २०१९ मध्ये संसदेमध्ये २६ मुस्लिम खासदार होता. त्यात काँग्रेस आणि टीएमसीचे प्रत्येकी चार, बीएसपी, एसपीचे प्रत्येकी ३ आणि सीपीआय, एनसीपीचे प्रत्येकी एक खासदार संसदेत होते.

कोणत्या पक्षाने किती मुस्लिम उमेदवारांना मैदानात उतरवले?

भाजपने एका मुस्लिम उमेदवाराला मैदानात उतरवले आहे. सर्वाधिक ३५ उमेदवार बसपने उतरवले आहेत. यातील १७ उमेदवार यूपीतील आहेत. बसपाने २०१९ मध्ये ३९ तर २०१४ मध्ये ६१ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले होते. बसपनंतर काँग्रेसचा क्रमांक लागतो. काँग्रेसने १९ मुस्लिम उमेदवार दिले आहेत. महाराष्ट्रात एकही उमेदवार दिलेला नाही. काँग्रेसने २०१९ मध्ये ३४ तर २०१४ मध्ये ३१ मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले होते.

टीएमसी तिसऱ्या क्रमांकावर असून सहा मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवले आहेत. २०१९ मध्ये १३ तर २०१४ मध्ये २४ उमेदवार तृणमूलने दिले होते. समाजवादी पक्षाने चार मुस्लिमांना तिकीट दिलं आहे. २०१९ मध्ये ८ तर २०१४ मध्ये ३९ मुस्लिम उमेदवारांना संधी दिली होती.

२०२४ मध्ये पक्षाकडून किती मुस्लिम उमेदवार रिंगणात?

बसपा ३५ ( २०१४ मध्ये ३९)

काँग्रेस १९ (२०१४ मध्ये ३४)

टीएमसी ६ (२०१४ मध्ये १३)

सपा ४(२०१४ मध्ये ८)

आरजेडी ५ ( २०१४ मध्ये २)

भाजप १

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''मोदींमार्फत अल्लाने सगळं दिलंय, कुणाची मदत नको'' अपंग असलेल्या मुस्लिम व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल

माेठी बातमी! 'सातारा जिल्ह्यातील आमदार आठ महिने निधीविनाच'; फंडातील विविध कामांना ब्रेक, अधिवेशनात घोषणेची शक्यता

Viral Video: नवरा फोनमध्ये व्यस्त, पत्नी संतापली, रागात असं काही केलं की...; व्हिडिओच व्हायरल झाला, पाहा पोस्ट

Ashadhi Wari 2025: मृदंगाच्या थापाने वाढविली वारकऱ्यांची ऊर्जा; घळाटवाडीच्या गणेश महाराजांची पंढरीच्या वारीत वादनसेवा

Tata Group: टाटा ग्रुपच्या कंपनीचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला; ब्रोकरेजनेही दिला अलर्ट, गुंतवणूकदार चिंतेत

SCROLL FOR NEXT