rahul gandhi nitish kumar chandrababu naidu  
देश

Lok Sabha Election Result: काँग्रेस नेतृत्त्वाची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडूंशी चर्चा सुरु? दिल्लीत हालचालींना वेग

Congress leadership talks with Nitish Kumar : भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला जवळपास ३५० जागा मिळतील हे जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- एक्झिट पोलनुसार सध्याचे कल दिसत नाही. भाजपच्या नेतृत्त्वातील एनडीएला जवळपास ३५० जागा मिळतील हे जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलं होतं. पण, सध्या भाजपला ३०० जागांसाठी झगडावं लागतंय असं दिसतंय. दुसरीकडे, काँग्रेसच्या नेतृत्त्वातील इंडिया आघाडी चांगली कामगिरी करताना दिसत आहे.

काँग्रेस सध्या २३० ते २४० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसने सरकार स्थापनेचा विचार सुरु केला असल्याचं दिसत आहे. बहुमतासाठी २७२ जागांची आवश्यकता आहे. याचमुळे काँग्रेस ३० ते ४० जागा एनडीएमधील घटक पक्षांकडून मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसच्या नेतृत्त्वाने जेडीयूचे नितीश कुमार आणि तेलगु देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा सुरु केली आहे.

आंध्र प्रदेशमध्ये टीडीपी १६ जागांवर आघाडीवर आहे, बिहारमध्ये जेडीयू आणि भाजप एकत्र निवडणूक लढवत आहेत. नितीश कुमार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आरजेडीची साथ सोडून भाजपला जवळ केले होते. त्यांमुळे पुन्हा एकदा नितीश कुमार यांना आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करु शकते. नितीश कुमारांनी आतापर्यंत तीनवेळा पलटी मारली आहे. त्यामुळे चौथ्यांदा पलटी मारणे त्यांच्यासाठी कठीण नसणार आहे. याशिवाय चंद्राबाडू नायडू हे देखील संधी पाहून इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात. याचा फायदा काँग्रेस घेऊ पाहात आहे.

राजकीय विश्लेषक आणि एक्झिट पोलमध्ये जसा अंदाज वर्तवला त्यानुसार निकाल लागत नसल्याचं दिसत आहे. अपेक्षेपेक्षा इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली असल्याचं बोललं जात आहे. काँग्रेसने तीन अंकी जागा मिळवण्यात यश मिळवलं आहे. शिवाय इंडिया आघाडीमधील घटकपक्षांसोबत मिळून काँग्रेस चांगल्या स्थितीत आली आहे.

काँग्रेसने म्हणूनच छोट्या पक्षाची साथ मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या या हाकेला कोण ओ देतं का हे पाहावं लागणार आहे. मात्र, देशाला सक्षम विरोधीपक्ष मिळेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या दोन लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा मोठा पराभव सहन करावा लागला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT