congress sonia gandhi rahul gandhi esakal
देश

Loksabha Election 2024 : सामान्य जनतेला आकर्षित करण्यासाठी काँग्रेसची खेळी; जाहीरनाम्यासंदर्भात घेतला 'हा' निर्णय

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस पक्ष थेट जनतेशी संवाद साधणार आहे. मतदारांना ऑनलाईनद्वारे सुद्धा काँग्रेसकडे आपल्या सूचना व प्रस्ताव पाठविता येणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा तयार करण्यासाठी काँग्रेस पक्ष थेट जनतेशी संवाद साधणार आहे. मतदारांना ऑनलाईनद्वारे सुद्धा काँग्रेसकडे आपल्या सूचना व प्रस्ताव पाठविता येणार आहेत. या सूचनांचा विचार करून काँग्रेस पक्ष निवडणूक जाहीरनामा तयार करणार आहे.

काँग्रेसने निवडणूक जाहीरनामा तयार करण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांच्या अध्यक्षतेखाली १६ सदस्यीय समिती गठित केली आहे. या समितीची काही दिवसांपूर्वी दिल्लीत बैठक झाली होती. यात लोकांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत, याचे प्रतिबिंब निवडणूक जाहीरनाम्यात पडले पाहिजे, या प्रकारचे विचार व्यक्त करण्यात आले होते.

यामुळे समितीच्या प्रत्येक सदस्याला दोन राज्यांची जबाबदारी दिली जाणार आहे. हे सदस्य त्या राज्यांमध्ये पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मोठ्या शहरांमध्ये तसेच जिल्हा पातळीवर लोकांशी थेट संवाद साधणार आहेत. प्रदेश काँग्रेस व जिल्हा पातळीवरील काँग्रेसच्या नेत्यांनी जिल्हा व तालुका पातळीवरही मेळावे घ्यावे, असे सांगण्यात आले आहे. जनतेकडून मिळालेल्या सूचनांचा अंतर्भाव जाहीरनाम्यात करण्यात येईल. हा जाहीरनामा जनतेचा राहील, असे पी. चिदंबरम यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

डिजिटल माध्यम उपलब्ध

ज्या लोकांपर्यंत पक्ष पोचू शकणार नाही किंवा ते पक्षांपर्यंत येऊ शकत नाही, त्या लोकांना डिजिटल माध्यम काँग्रेस पक्षाने उपलब्ध करून दिले आहे. पक्षाचे www.awaazbharatki.in हे संकेतस्थळ सुरू केले आहे. या संकेतस्थळावर सूचना देता येणार आहे. तसेच awaazbharatki@inc.in या मेल आयडीवर मतदारांना आपल्या सूचना किंवा प्रस्ताव पाठविता येणार आहे.

या प्रस्तावांचा विषयनिहाय वर्गीकरण केल्यानंतर या सूचना काँग्रेसच्या जाहीरनाम्यात समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही पी. चिदंबरम यांनी सांगितले. यावेळी जाहीरनामा समितीचे समन्वयक टी. एस. सिंगदेव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT