Narendra modi and Rahul Gandhi 
देश

Congress : विविध राज्यांतील दंगली म्हणजे भाजपची २०२४च्या निवडणुकीची तयारीच; काँग्रेस नेत्याचा दावा

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी शनिवारी (2024 एप्रिल 1) भारतीय जनता पक्षावर मोठा आरोप केला आहे. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जवळ येत असताना भाजप जातीय हिंसाचार भडकवण्याचा कट रचत असून पश्चिम बंगाल आणि गुजरातमध्ये नुकत्याच घडलेल्या घटना हा त्याचा 'ट्रेलर' आहे, असे सिब्बल म्हणाले.

पश्चिम बंगालमधील हावडा जिल्ह्यात गुरुवारी (31 मार्च 2023) रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांमध्ये हाणामारी झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप केले आहेत. रामनवमीच्या काळात गुजरात आणि महाराष्ट्रातूनही हिंसाचार झाल्याच्या बातम्या आल्या आहेत.

सिब्बल म्हणाले की, 2024 जवळ येत असून भाजप विविध योजनांवर काम करत आहेत. यामध्ये निवडणूक आयोगाचा वापर करून विरोधकांना लक्ष्य करणे, जातीय हिंसाचार, हेट स्पीच आणि कंटेंट, अल्पसंख्याकांचा छळ, ईडी (अंमलबजावणी संचालनालय), सीबीआय (केंद्रीय अन्वेषण विभाग) च्या माध्यमातून विरोधकांना लक्ष्य करणे, अशी उपरोधिक टीकाही सिब्बल यांनी केली. तसेच पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरातमधील हिंसाचाराच्या घटना ट्रेलर असल्याचा दावाही सिब्बल यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident : संतोष आणि मोहम्मद जिवलग मित्र पण नियतीच्या मनात वेगळ होतं..., दुचाकींच्या धडकेत दोघे मित्र ठार

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Latest Marathi News Live Update: नुकसानग्रस्तांना मदत करण्याची सरकारची भूमिका - अमित शाह

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

SCROLL FOR NEXT