Suspended MP's Esakal
देश

Suspended MP's : 'त्या' खासदारांना संसदेच्या लॉबीमध्ये देखील जाता येणार नाही, लोकसभा सचिवालयाचा कडक आदेश

हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेतून आत्तापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसदेतून आत्तापर्यंत १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. १३ डिसेंबरला अधिवेशन सुरू असतानाच लोकसभेत दोन अज्ञात तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर त्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकारावर पंतप्रधान मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. (Marathi Tajya Batmya)

तर या गोष्टीवरून गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यात आता लोकसभा सचिवालयाने निलंबित खासदारांसाठी एक परिपत्रक काढलं असून त्यांना काही सूचना केल्या आहेत. 

निलंबित खासदारांवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी लोकसभा सचिवालयाने एक परिपत्रक जारी केले आहे. त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की निलंबित करण्यात आलेल्या 141 खासदारांना संसदेच्या चेंबर, लॉबी आणि गॅलरीमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

लोकसभेतून एकूण ९५ खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. तर ४६ सदस्यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. या खासदारांवर संसदेच्या कामकाजात अडथळा आणल्याचा आरोप आहे. संसदेच्या कामकाजानंतर, इंडीया आघाडीने शुक्रवारी देशव्यापी सरकारविरोधी आंदोलनाची घोषणा केली आहे.

निलंबित झालेल्या खासदारांसाठी लोकसभा सचिवालयाने एक सूचनापत्र जारी केलं आहे. खासदार जोपर्यंत निलंबित आहेत, तोपर्यंत ही नियमावली लागू असेल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. 

हे नियम निलंबनाच्या कालावधीत लागू राहतील-

  • निलंबनाच्या काळात खासदार संसद भवनातील चेंबर्स, लॉबी किंवा गॅलरीमध्ये प्रवेश करू शकत नाहीत.

  • निलंबित खासदार सदस्यांना संसदीय समितीच्या बैठकांना त्यांना उपस्थित राहता येणार नाही.

  • लोकसभेच्या कामकाजात त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव किंवा मुद्दा नमूद केला जाणार नाही.

  • निलंबनाच्या काळात त्यांनी दिलेली कोणतीही नोटीस कामकाजात समाविष्ट केली जाणार नाही.

  • या काळात घेण्यात आलेल्या कोणत्याही संसदीय समिती निवडणुकीत त्यांना मत देता येणार नाही.

  • या काळात त्यांना संसद कामकाजासाठी मिळणारा दैनंदिन भत्ता मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

व्वा, काय व्यवस्था आहे! तरुणपणी परीक्षा दिली, पण सेवानिवृत्तीचे वय ओलांडल्यानंतर आलं नियुक्तीपत्र, लोकसेवा आयोगाचा गोंधळ

हायव्होलटेज ड्रामा! आधी उमेदवारी अर्ज बाद झाला, आता पित्रा-पुत्रावर गुन्हा दाखल; अमरावतीत शिंदेसेनेच्या दिग्गज नेत्यावर कारवाई

'तु माझ्या आयुष्यातली सगळ्यात...' 'ही' अभिनेत्री आहे तेजश्रीची बेस्ट फ्रेंड, सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाली...

Latest Marathi News Live Update : वारणानगर परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

Sugarcane Protest: अंगावर पाऊस, डोळ्यांत आशा; उसाच्या पैशांसाठी शेतकऱ्यांचा 'गोकूळ'विरुद्ध संघर्ष सुरूच, जिल्‍हाधिकाऱ्यांसोबतची बैठक निष्फळ..

SCROLL FOR NEXT