Parliament Security Breach Esakal
देश

Parliament Security Breach: संसदेतील घुसखोरीच्या घटनेनंतर सर्वात मोठी कारवाई, ७ कर्मचाऱ्यांना केलं निलंबित

संसदेतील काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकरणी लोकसभा सचिवालयानं सर्वात मोठी कारवाई केली आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

संसदेतील काल झालेल्या घुसखोरीच्या घटनेनंतर सुरक्षेतील त्रुटी समोर आल्या आहेत. या प्रकरणी लोकसभा सचिवालयानं सर्वात मोठी कारवाई केली आहे. संसदेवरील हल्ल्यात सुरक्षेतील त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आणखी लोकांवर कारवाई होऊ शकते.(Latest Marathi News)

संसदेवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था

काल (13 डिसेंबर) झालेल्या सुरक्षा भंगाच्या घटनेनंतर संसदेत सुरक्षा वाढवण्यात आली होती. मकर गेटमधून केवळ खासदारांनाच संसद भवनात प्रवेश दिला जात असून इमारतीत प्रवेश करणाऱ्या सर्व व्यक्तींचे बूट काढून त्यांची कसून तपासणी केली जात आहे. (Marathi Tajya Batmya)

लोकसभेत स्मोक बॉम्ब सोडणाऱ्या ४ आरोपींना अटक, पटियाला हाऊस कोर्टात केलं जाणार हजर

लोकसभेत स्मोक बॉम्ब सोडणाऱ्या सहा आरोपींपैकी चौघांना अटक करण्यात आली आहे, एक पोलिस कोठडीत असून सहाव्या आरोपीचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपी अमोल, नीलम, सागर शर्मा आणि मनोरंजन यांना दिल्ली पोलिस आज पटियाला हाऊस कोर्टात हजर करणार आहेत. पोलीस या आरोपींची कोठडी मागणार आहेत.(4 accused who released smoke bombs in Lok Sabha arrested)

या संपुर्ण प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत चार आरोपींना अटक केली आहे, या आरोपींना आश्रय देणाऱ्या विकी शर्मा आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या प्रकरणातील चार आरोपींचा साथीदार ललित झा याचा पोलीस शोध घेत आहेत. ललित झा हा तोच व्यक्ती आहे जो संसदेबाहेर झालेल्या स्मोक हल्ल्याचा व्हिडिओ बनवत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Tourism Latest Update : गणपतीपुळे बीच अखेर पर्यटकांसाठी खुला! 2 महिन्यांनंतर बंदी उठवली; पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण

थकलेला चेहरा, चालताही येईना... नवऱ्याला अखेरचा निरोप देताना अरुणा इराणी यांना अश्रू अनावर; या कलाकारांचीही हजेरी

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

SCROLL FOR NEXT