nitish kumar and chandrababu naidu sakal
देश

Lok Sabha Speaker : भाजपचं टेन्शन वाढलं! लोकसभा अध्यक्ष पदासाठी चंद्राबाबू नायडूंची 'ही' अट; नितीश कुमारांची भूमिका काय?

संसदेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी २६ जून रोजी लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडीवरुन विरोधी पक्षाने रान उठवलं आहे. लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटकपक्षांना मिळालं पाहिजे, अशी भूमिका विरोधी नेते मांडत आहेत.

संतोष कानडे

Lok sabha speaker election : देशामध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झालं आहे. नवीन सरकारच्या शपथविधीनंतर संसदेचं पहिलं सत्र २४ जूनपासून सुरु होणार आहे. आठ दिवस अधिवेशन चालणार आहे.

संसदेच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी २६ जून रोजी लोकसभेच्या अध्यक्षांची निवड होणार आहे. या निवडीवरुन विरोधी पक्षाने रान उठवलं आहे. लोकसभेचं अध्यक्षपद एनडीएच्या घटकपक्षांना मिळालं पाहिजे, अशी भूमिका विरोधी नेते मांडत आहेत.

याच मुद्द्यावरुन नितीश कुमारांच्या जेडीयू पक्षाने भूमिका स्पष्ट केली असून भाजप जो काही निर्णय घेईल, त्याच्यासोबत आम्ही असू, असं म्हटलं. दुसरीकडे चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीने अध्यक्षांची निवड ही सर्व घटकपक्षांच्या सहमतीने करावी, अशी भूमिका घेतली आहे.

'टीडीपी'चं म्हणणं काय?

टीडीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते पट्टाभि राम कोमारेड्डी यांनी सर्वांची सहमती असलेल्या उमेदवाराची निवड लोकसभा अध्यक्ष पदासाठी करावी, अशी मागणी केली आहे. ''अध्यक्ष निवडीसाठी एनडीएचे सर्व सहकारी पक्ष एकत्र बसतील आणि ठरवतील. सर्वांनी निश्चित केल्यानंतरच उमेदवर दिला जाईल. त्यानंतर टीडीपीसह सर्व घटकपक्ष उमेदवाराचं समर्थन करतील'' असं कोमारेड्डी म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT