Lok Sabha Working Committee esakal
देश

Lok Sabha Working Committee: लोकसभा कामकाज समितीत शिंदे, पवार गटाला स्थान नाही! शिवसेना ठाकरे गटाचा मात्र समावेश

Lok Sabha Working Committee update: अधिवेशन काळात दर आठवड्याला समितीची बैठक होत असते आणि सभागृहासमोर येणाऱ्या विषयांचा प्राधान्यक्रम व त्यासाठीचा वेळ यावर समितीच्या बैठकीत सहमतीने निर्णय केला जातो.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली: संसदेत लोकसभेच्या कामकाजासाठी अध्यक्षांकडून नेमल्या जाणाऱ्या कामकाजविषयक सर्वपक्षीय समितीमध्ये सत्ताधारी भाजप, प्रमुख विरोधी पक्ष कॉँग्रेस, द्रमुक, संयुक्त जनता दल, तेलुगू देसम, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह महाराष्ट्रातील केवळ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.

सत्ताधारी एनडीएचा प्रमुख घटक असलेल्या शिवसेना (शिंदे गट) या पक्षाला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला कामकाज विषयक समितीमध्ये स्थान मिळालेले नाही.

संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून (ता. २२) सुरू होणार आहे. लोकसभेच्या कामकाजासाठी सर्वपक्षीय प्रतिनिधींचा समावेश असलेली कामकाजविषयक समिती लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी नियुक्त केली आहे. या १४ सदस्यीय समितीच्या अध्यक्षपदी स्वतः ओम बिर्ला असतील.

तर सुदीप बंदोपाध्याय (तृणमूल कॉंग्रेस), पी. पी. चौधरी (भाजप), लवू श्रीकृष्ण देवरायालू (तेलुगू देसम), निशिकांत दुबे (भाजप), गौरव गोगोई (काँग्रेस), संजय जयस्वाल (भाजप), दिलेश्वर कामत (संयुक्त जनता दल), दयानिधी मारन (द्रमुक), वैजयंत पांडा (भाजप), अरविंद सावंत (शिवसेना उध्दव ठाकरे), के. सुरेश (काँग्रेस), अनुराग ठाकूर (भाजप), लालजी वर्मा (समाजवादी पक्ष) या सदस्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे.

अधिवेशन काळात दर आठवड्याला समितीची बैठक होत असते आणि सभागृहासमोर येणाऱ्या विषयांचा प्राधान्यक्रम व त्यासाठीचा वेळ यावर समितीच्या बैठकीत सहमतीने निर्णय केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

Asia Cup Final: स्मृती मानधना - शफली वर्माचे तब्बल तीन वर्ल्ड रेकॉर्ड! भारताचे श्रीलंकेसमोर भलंमोठं लक्ष्य

Mohol drought crisis: मोहोळ तालुका दुष्काळाच्या गडद छायेत; खरीप-रब्बी हंगाम उद्ध्वस्त, चारा टंचाईने शेतकरी आर्थिक कोंडीत

Marathi News Live Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT