ex soldier to contest against PM Modi at varanasi 
देश

Loksabha 2019 : वाराणसीत देशाचे दोन 'चौकीदार' येणार आमने-सामने

वृत्तसंस्था

वाराणसी: लोकसभा निवडणूकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवार) वाराणसी मतदार संघामधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोदी यांच्या विरोधात 100 हून अधिक निवृत्त आणि निलंबित लष्कर आणि निमलष्कराच जवान लढणार आहेत, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

शंभरहून अधिक जवान हे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रचार करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी लष्कराला दुर्बळ करत असून, भष्टाचाराला खतपाणी घालत आहेत, असे या जवानांचं म्हणणे आहे. हे सर्व जवान वाराणसीमधील मडुआ डीह येथे थांबले आहेत. मोदींच्या विरोधातील हे सर्व जवान जेवणाच्या निकृष्ट दर्जाची तक्रार करणाऱ्या सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान तेज बहादूर यांच्या समर्थनार्थ प्रचार करणार आहेत. या जवानांनी नरेंद्र मोदींना उमेदवारी अर्ज दाखल करताना काळे झेंडे दाखवण्याचा निर्धार केला होता. आपण एक खरे चौकीदार असून, खोट्या चौकीदाराविरोधात लढत आहोत, असे तेज बहादूर यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी आपण पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राइक केल्याचे सांगत मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. याप्रकरणी माजी लष्कर प्रमुखांसह अनेक निवृत्त जवानांनी राष्ट्रपतींकडे तक्रार केली आहे. आपले अधिकारी आणि भ्रष्टाचाराचा विरोध केल्याची किंमत आपल्याला चुकवावी लागत आहे, असे जवानांचे म्हणणे आहे. सरकारने भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याची तक्रार आहे. 2001 साली लष्करातून निवृत्त झालेले 62 वर्षीय ओम प्रकाश सिंह म्हणाले, 'सप्टेंबर 2016 मध्ये करण्यात आलेली सर्जिकल स्ट्राइक पहिलीच नव्हती. मी स्वत: याआधी पाकिस्तानात जाऊन कऱण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकचा भाग राहिलो आहे.'

सीआरपीएफमधून निलंबित झालेले 32 वर्षीय पंकज मिश्रा म्हणाले, 'जवानांकडून जवळपास चार हजार तक्रारी आल्या आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांकडून आपल्या घरातील छोटी कामे करण्यासाठी जबरदस्ती केली जात असल्याचाही उल्लेख आहे. या सर्व तक्रारी गेल्या तीन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयात प्रलंबित आहेत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT