Hema Malini - Sapna Choudhary 
देश

Loksabha 2019 : मथुरेत हेमा विरुद्ध सपना?

वृत्तसंस्था

नवी दिल्लीः हरियानाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असून, ती मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभेसाठी हेमा मालिनी यांना मथुरा मतदारसंघामधून उमेदवारी जाहिर केली आहे. यामुळे अभिनेत्री हेमा मालिनी विरुद्ध सपना चौधरी अशी लढत मथुरेत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सपना चौधरी ही काँग्रेस मधील वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असून, ती मथुरा मतदार संघातून निवडणूक लढवणार असल्याचे समजते. उत्तर भारतात सपनाचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. हेमा मालिनी आणि सपना चौधरी हे दोन्ही लोकप्रिय चेहरे आहेत. काँग्रेसने जर सपनाला संधी दिली तर दोघींमध्ये जिंकण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळेल. मथुरा मतदार संघातील जाट समाजाला आकर्षित करून घेण्यासाठी काँग्रेसला सपना चौधरी मदत करू शकेल.'

हेमा मालिनी यांच्याविरोधात सपना चौधरी निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. मात्र, सपना चौधरी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणार की नाही याबाबत काँग्रेसने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हेमा मालिनी या प्रसिद्ध अभिनेत्री असून, त्यांनी चार दशके हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवलेले आहे. दुसरीकडे सपना चौधरी यांचा नृत्य सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, उत्तर भारतात तिचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. यामुळे काँग्रेसने सपाना चौधरीला मथुरेमधून उमेदवारी दिली तर हेमा विरुद्ध सपना अशी चुरशीची निवडणूक होईल, अशी चर्चा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : सातारा जिल्हा परिषदेत बहिष्कार; सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता

Jalna News: अवकाळीचा कांदा बीजोत्पादनाला फटका; शेतकरी संकटात; धाकलगाव परिसरातील चित्र

Bullet Rider Assaults Traffic Police in Solapur : लायसन्स, नंबरप्लेट नाही, मॉडिफाइड सायलेन्सर, तरीही पोलिसाला खल्लास करण्याची दिली धमकी

Hacking Safety Tips : हॅकर्स करणार गुन्हा अन् तुम्ही जाल तुरुंगात! घरातली 'ही' स्वस्त वस्तु तुम्हाला बनवत आहे अपराधी? आजच करा चेक

तुझी जात काय? भर सेटवर अभिनेत्याने विचारला प्रश्न; 'अग्गंबाई सुनबाई' फेम अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली-

SCROLL FOR NEXT