CM Siddaramaiah esakal
देश

'जनतेची काळजी असलेल्या राहुल गांधींनाच देशाचा पंतप्रधान बनवा'; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका

'मतभेद बाजूला ठेवून राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधान करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार.'

सकाळ डिजिटल टीम

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी संघ परिवार किंवा भाजपमधील कोणीही बलिदान दिलेले नाही.

बंगळूर : मतभेद बाजूला ठेवून राहुल गांधींना (Rahul Gandhi) पंतप्रधान करण्यासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री सिद्धरामय्या (CM Siddaramaiah) यांनी येथे केले. कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती कार्यालयात आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या १३९ व्या स्थापना दिन कार्यक्रमात ते बोलत होते.

ते म्हणाले, ‘‘देशातील अन्य कोणत्याही नेत्याने भारत जोडोसारखी यात्रा (Bharat Jodo Yatra) काढली नव्हती. आता राहुल गांधींनी दुसऱ्या टप्प्यात ‘भारत न्याय यात्रा’ काढत आहेत. त्यासाठी राहुल गांधींनी या देशाचे पंतप्रधान होण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पंतप्रधानपद बनविण्यासाठी सुचविले होते.’’

त्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत स्पष्ट वक्तव्य सिद्धरामय्या यांनी केले. राहुल गांधीच देशाचे पंतप्रधान व्हायला हवेत. जनतेची काळजी असलेल्या राहुल गांधींच्या हातात सत्ता गेली पाहिजे. देशाच्या संविधानाचे आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आपण सर्वांनी लढून संविधानाचे रक्षण करून काँग्रेसला सत्तेत आणले पाहिजे, असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ‘‘१२ वर्षे मुख्यमंत्री आणि १० वर्षे पंतप्रधान राहिलेले नरेंद्र मोदी ‘पंचहमी’ योजना राबविल्या तर सरकार दिवाळखोर होईल, असे म्हणाले होते. आम्ही पाच हमींची यशस्वी अंमलबजावणी केली आहे. त्यानंतरही आमची आर्थिक स्थिती भक्कम आहे.’’

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी संघ परिवार किंवा भाजपमधील कोणीही बलिदान दिलेले नाही. आरएसएसची स्थापना १९२५ मध्ये झाली. जनसंघाची स्थापना १९५० मध्ये झाली. १९८० मध्ये भाजप अस्तित्वात आला. आरएसएसने स्वातंत्र्यासाठी त्यांच्या एका व्यक्तीने तरी बलिदान दिले आहे, हे दाखवून द्यावे, असे आव्हान त्यांनी दिले. कार्यक्रमाला केपीसीसीचे कार्याध्यक्ष सलीम अहमद, आरोग्यमंत्री दिनेश गुंडूराव, वनमंत्री ईश्वर खांड्रे, माजी मंत्री राणी सतीश आदी उपस्थित होते.

भाजपचे योगदान काय आहे?

काँग्रेस राजकीय पक्ष नसून ती एक चळवळ आणि विचारधारा आहे. आजची डिजिटल क्रांती राजीव गांधी यांनी आणली. नेहरुंनी आधुनिक भारत घडवला. इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी कार्यक्रम बनवले. मोदींच्या नेतृत्वाखाली १० वर्षे राज्य करणाऱ्या भाजपचे योगदान काय आहे? त्यांनी देशात एकतरी धरण बांधले आहे का, असा सवाल त्यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT