Congress Candidate List esakal
देश

Congress Candidate List : काँग्रेसचे सात उमेदवार ठरले; पुण्यातून धंगेकर, कोल्हापुरातून शाहू छत्रपती

Congress Candidate List : काँग्रेसने राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे या नावांचा समावेश आहे.

संतोष कानडे

Congress Candidate List : काँग्रेसने राज्यातील सात उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कोल्हापुरातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे या नावांचा समावेश आहे.

या सात उमेदवारांच्या नावांची घोषणा

१. नंदुरबार- गोवाल पाडवी

२. अमरावती- बळवंत वानखेडे

३. नांदेड- वसंतराव चव्हाण

४. पुणे- रवींद्र धंगेकर

५. लातूर- डॉ. शिवाजीराव कळगे

६. सोलापूर- प्रणिती शिंदे

७. कोल्हापूर- शाहू महाराज छत्रपती

राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी १८ जागांवर काँग्रेस आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती येत आहे. दिल्लीमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत सात जणांची नावं फायनल झाली आहेत.

दरम्यान, ८ मार्च रोजी काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून सात, केरळमधून १६, लक्षद्वीपमधून एक, मेघालयातून दोन, नागालँडमधून एक, सिक्कीममधून एक, तेलंगणातून चार आणि त्रिपुरातून एक उमेदवार उभा करण्यात आला आहे.

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्ती घेतल्यानंतर आमदार प्रणिती शिंदे यांना देशाच्या राजकारणात संधी मिळेल, असा सर्वांनाच विश्वास होता. त्यानुसार आता काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्याच यादीत आमदार प्रणिती शिंदेंचे नाव आले आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच प्रणिती शिंदे यांनी मोहोळ, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा या तालुक्यांमध्ये दौरे करून छोट्या छोट्या सभा देखील घेऊन प्रचारात आघाडी मिळविली आहे.

पुण्याच्या जागेविषयी राज्यात उत्सुकता आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे यावेळची पुणे लोकसभेची चुरस रंगतदार होणार, यात शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT