

Ayush Mhatre U19 Team India Captain
Sakal
Ayush Mhatre U19 Team India Captain: भारतीय संघाने शुक्रवारी १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करताच आयुष म्हात्रेने मोहम्मद कैफ, विराट कोहलीच्या पंक्तीत स्थान मिळवले. भारताच्या युवा संघाने शुक्रवारी इंग्लंडच्या युवा संघाला १०० धावांनी पराभूत केले. त्यामुळे भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कपवर नाव कोरले.
भारताने सहाव्यांदा १९ वर्षांखालील वर्ल्ड कप (U19 World Cup) जिंकला आहे. या विजयामुळे आता आयुष म्हात्रेकडे (Ayush Mhatre) भारताचा युवा विश्वविजेता कर्णधार (Captain) म्हणून पाहिले जाणार आहे.