

India U19 World Cup 2026
Sakal
U19 India Celebration After World Cup Victory: भारतीय क्रिकेट संघाने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा शुक्रवारी जिंकली. अंतिम सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडच्या युवा संघाला हरारेमध्ये १०० धावांनी पराभूत केले. भारतीय संघाचे हे सहावे विजेतेपद आहे.
भारतीय संघ हा या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. भारताने शुक्रवारी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात हे विजेतेपद मिळवले. या विजयानंतर भारताच्या युवा खेळाडूंनी जोरदार सेलिब्रेशन देखील केले. याचे व्हिडिओडी सध्या व्हायरल होत आहेत.