congress nagpur meeting of kharge and rahul gandhi lok sabha election politics sakal
देश

Congress seat allocation : काँग्रेसच्या 39 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; राहुल गांधींचा मतदारसंघ ठरला

Congress seat allocation काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ३९ उमेदवारांच्या नावाची घोषणा काँग्रेसने केली आहे.

संतोष कानडे

नवी दिल्लीः काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली होती. या बैठकीनंतर काँग्रेसने लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. ३९ उमेदवारांच्या नावाची घोषणा काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत 39 नावे आहेत. यामध्ये छत्तीसगडमधून सहा, कर्नाटकातून सात, केरळमधून १६, लक्षद्वीपमधून एक, मेघालयातून दोन, नागालँडमधून एक, सिक्कीममधून एक, तेलंगणातून चार आणि त्रिपुरातून एक उमेदवार उभा करण्यात आला आहे.

काँग्रेसमध्ये यादीमध्ये वायनाडमधून राहुल गांधी, तिरुअनंतपुरममधून शशी थरूर, अलप्पुझामधून केसी वेणुगोपाल, राजनांदगावमधून भूपेश बघेल, मेघालयमधून व्हिन्सेंट पाला आणि त्रिपुरा पश्चिममधून आशिष साहा यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली आहे.

मध्यप्रदेश, राजस्थान, हरियाना, पंजाब या राज्यांतील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. घोषित केलेल्या यादीत १५ खुल्या प्रवर्गातील, ३ महिला तर २४ हे अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी व अल्पसंख्याक समुदायाचे उमेदवार असल्याचे पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.

राज्यनिहाय उमेदवार
१६- केरळ
७- कर्नाटक
६- छत्तीसगड
४- तेलंगण
२-मेघालय
१-नागालँड, सिक्कीम
आणि त्रिपुरा
१- लक्षद्विप

अपेक्षेप्रमाणे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी वायनाड याच मतदारसंघाला पसंती दिली आहे. केरळमधील जवळपास सर्वच उमेदवारांची नावे काँग्रेसने घोषित केली आहेत. यामध्ये विशेष म्हणजे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना अलपुझ्झा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. वेणुगोपाल यांची मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते ए. एम. आरिफ यांच्याशी त्यांची थेट लढत होण्याची शक्यता आहे. वेणुगोपाल सध्या राजस्थानमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नेते डॉ. शशी थरूर यांनी तिरुअनंतपुरम येथून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा मुकाबला आता केंद्रीय राज्यमंत्री भाजपचे उमेदवार राजीव चंद्रशेखर यांच्याशी होणार आहे. केरळमधून राम्या हरदास, हिबी एडन, के. सुधाकरन, के. मुरलीधरन, डीन कोरईकोस, के. सुरेश, अँटो अँटोनी या विद्यमान खासदारांवर पक्षाने पुन्हा विश्वास दाखविला आहे.

बघेल राजनंदगावमधून लढणार
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना राजनंदगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस नेते भक्तचरण दास यांच्या पत्नी ज्योत्स्ना महंत यांना कोरबा येथून तर विद्यमान खासदार ताम्रध्वज साहू यांना पुन्हा महासमुंद येथून उमेदवारी देण्यात आली. कर्नाटकमधून ७ उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात विद्यमान खासदार डी. के. सुरेश यांना बंगळूर ग्रामीणमधून पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिमोगामधून गीता शिवराजकुमार यांना उमेदवारी दिली आहे.

तेलंगणचे चार उमेदवार जाहीर
तेलंगणातील केवळ चार उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात झहिराबाद येथून सुरेशकुमार शेटकर, मेहबूबनगरमधून चल्ला वामसी चंद रेड्डी व नळगोंडामधून काँग्रेसचे नेते जना रेड्डी यांचे चिरंजीव के. रघुवीर रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्य मेघालयातून व्हिन्सेंट पाला व सालेंग संगमा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधून काँग्रेसने मोहम्मद हमदुल्ला सईद यांना उमेदवारी दिली आहे. सध्या येथे शरद पवार गटाचे मोहंमद फैजल विद्यमान खासदार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

IPL मध्ये कॅप्टनला जाब विचारला जातो...केएल राहुलचा LSG चे मालक गोयंकांवर अप्रत्यक्ष निशाणा?

Horoscope Marathi : कुणाला होणार धनलाभ तर कुणाला मोठा तोटा! कसा असेल तुमचा उद्याचा दिवस? पाहा मेष ते मीन सर्व राशींचे राशीभविष्य

Kolhapur News: कोल्हापूरमध्ये कुष्ठरोगाविरुद्ध मोठी मोहीम सुरू; ३५ लाखांहून अधिक लोकांची घरोगरी तपासणी, प्रशासनाचा सर्वांना सहकार्याचा आग्रह

IND vs SA : 'तुमचा बँक बॅलन्स वाढवत राहा...' कोलकाता कसोटीनंतर पीटरसन संतापला; खेळाडूंसह क्रिकेट बोर्डालाही झापलं

SCROLL FOR NEXT