Loksabha Election 2024 Delhi High Command esakal
देश

Loksabha Election : भाजप-धजद युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नका; दिल्लीतून हायकमांडचा नेत्यांना स्पष्ट इशारा

राष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून आघाडीचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

काँग्रेसनेही आपल्या सर्व व्यथा विसरून सर्व पक्षांना एकत्र करून ‘इंडिया’सोबत युती केली.

बंगळूर : भाजपने धजदसोबत केलेल्या युतीबाबत (BJP-JDS Alliance) पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हायकमांडने (BJP High Command) स्पष्ट संदेश पाठविला आहे. धजदसोबतच्या युतीबाबत कोणीही उघड वक्तव्य करू नये, असा इशारा दिला आहे.

राष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून आघाडीचा निर्णय सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला. ज्येष्ठांच्या या निर्णयाचा भाजपच्या प्रत्येक नेत्याने आदर केला पाहिजे. युतीबाबत उघडपणे नाराजी, असंतोष व्यक्त करू नये. उघड नाराजी व्यक्त केल्यास तो पक्षशिस्तीचा भंग मानला जाईल, असा इशारा वरिष्ठांनी दिला आहे.

भाजप-धजद युतीबाबत सुरुवातीला आमदार एस. टी. सोमशेखर यांनी भुवया उंचावल्या होत्या. त्यानंतर खासदार डी. व्ही. सदानंद गौडा, बी. एन. बच्चेगौडा, माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य, माजी आमदार पृथ्वीगौडा यांच्यासह राज्यातील अनेक नेत्यांनी युतीला उघड विरोध केला होता.

या युतीमुळे जुन्या म्हैसूरमध्ये भाजपची सत्ता कमकुवत होईल. भाजपमध्ये वक्कलिग नेत्यांच्या म्हणण्यावर एकमत नाही. युतीची गरज नव्हती, असे खासदार सदानंदगौडा यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक नेत्यांनी याला सहमतीही दर्शवली. रेणुकाचार्य यांनी युतीवर नाराजी व्यक्त करत भाजप विसर्जित करणे चांगले होईल, असे घणाघाती विधान केले होते.

युतीबाबत बोलू नका, असा इशारा वरिष्ठांनी दिला असून राष्ट्रीय राजकारण डोळ्यासमोर ठेवून आम्ही युती केली आहे. काँग्रेसनेही आपल्या सर्व व्यथा विसरून सर्व पक्षांना एकत्र करून ‘इंडिया’सोबत युती केली. अशा स्थितीत भाजपनेही राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद वाढवण्यासाठी प्रादेशिक पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजय अत्यंत महत्त्वाचा आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन आम्ही युती केली आहे. युतीबाबत बोलू नका, असा सल्ला वरिष्ठांनी प्रदेश भाजप नेत्यांना दिला आहे.

‘युतीमुळे जास्त जागा जिंकू’

भाजप सर्व राज्यांमध्ये संबंधित राज्यांमध्ये मजबूत असलेल्या प्रादेशिक पक्षांशी युतीही करत आहे. त्यानुसार आम्ही राज्यातही धजदसोबत युती केली आहे. युतीमुळे लोकसभा निवडणुकीत भाजपला जास्त जागा जिंकता येतील, असे हायकमांडने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Crime:'पैशांवरून पत्नीचा खून; पतीस जन्मठेप'; गॅस टाकीसाठी ठेवलेले पैसे पतीने दारुत उडवले, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update: डिश बसवताना डोक्यावर पडली वीट

आम्ही सगळे थोडे घाबरलोय कारण... वहिनी कतरिना कैफच्या प्रेग्नन्सीबद्दल काय म्हणाला विकी कौशलचा भाऊ सानी कौशल?

OBC Reservation : धनगर समाजाने सत्ता काबीज करुन ओबीसींचं आरक्षण वाढवावं; प्रकाश आंबेडकरांनी सांगितला नवा फॉर्म्युला

Solapur News: सोलापुरात पूर ओसरल्यानंतरही डेंगी-टायफॉईडचा प्रादुर्भाव; मनपाकडून घरोघरी तपासणी सुरू

SCROLL FOR NEXT