देश

Voter Cards Video : जालन्यात शेकडो वोटर कार्ड कचऱ्यात फेकले; तपास सुरु, व्हिडीओ व्हायरल

मतदानाच्या तीन दिवस अगोदरच अशा प्रकारे कचऱ्यात वोटर कार्ड सापडल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. हे वोटर कार्ड नेमके कुणाचे आहेत आणि अशा पद्धतीने कचऱ्यात का टाकले? याबाबत कसून चौकशी होणार आहे. 'एएनआय'ने यासंबंधीचा व्हिडीओ 'एक्स'वर पोस्ट केला आहे.

संतोष कानडे

मुंबईः मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यामध्ये कचरा कुंडीमध्ये शेकडो वोटर कार्ड आढळून आलेले आहेत. या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त होत असून संबंधित यंत्रणेकडून तपास सुरु झाला आहे.

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यातच जालन्यात कचऱ्यात वोटर कार्ड सापडल्याने, या गंभीर प्रकाराची प्रशासनाने दखल घेतीलए. काही कर्मचाऱ्यांनी हे कार्ड ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवार दि. १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यमध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड आणि जालना जिल्ह्याचा समावेश आहे.

मतदानाच्या तीन दिवस अगोदरच अशा प्रकारे कचऱ्यात वोटर कार्ड सापडल्याने आश्चर्य व्यक्त होतंय. हे वोटर कार्ड नेमके कुणाचे आहेत आणि अशा पद्धतीने कचऱ्यात का टाकले? याबाबत कसून चौकशी होणार आहे. 'एएनआय'ने यासंबंधीचा व्हिडीओ 'एक्स'वर पोस्ट केला आहे.

पाचव्या टप्प्यात 'या' मतदारसंघांमध्ये मतदान

सोमवार, दि. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Electricity Bill: वीज ग्राहकांना दिलासा! महाराष्ट्रात वीज दर कमी होणार; पण कितीने? देवेंद्र फडणवीसांनी आकडाच सांगितला

असं कोणी करतं का? रशियन महिलेचा ढोकळा-प्रकरण पाहून लोकांनी डोकं धरलं...पाहा viral video

अहो माहेरी जाऊया ना...पत्नीचं ऐकून पती सासरी गेला; पण रागात सासऱ्यांनी 'त्या' गोष्टीमुळे क्रूरपणे जावयाचा जीव घेतला

Latest Marathi News Live Update : सोलापुरात पदनिवडीवरून मराठा समाजात मतभेद; क्रांती मोर्चाचा तीव्र विरोध

Helicopter crash news : देव तारी त्याला कोण मारी! हेलिकॉप्टरचा भीषण अपघात; एकाच घरातील ५ जण अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या कुटुंबाबाबत घडलं भयानक

SCROLL FOR NEXT