Loksabha Election 2024 sakal
देश

Loksabha Election 2024 : राज्यात आज पाच मतदारसंघांत मतदान; विधानसभेचा कौलही ईव्हीएममध्ये होणार बंद

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यातील मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज (ता. १९) २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्प्यातील मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज (ता.१९) २१ राज्यांतील १०२ मतदारसंघांमध्ये मतदान पार पडेल. राज्यात विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. तमिळनाडूतील सर्व म्हणजे ३९ लोकसभा मतदारसंघांत पहिल्याच टप्प्यात मतदान होईल. देशातील कोट्यवधी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.

संवेदनशील भागांत ‘ईव्हीएम मशीन व मतदान अधिकाऱ्यांना पोचविण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (नागपूर), किरेन रिजिजू (अरुणाचल पश्चिम), अर्जुनराम मेघवाल (बिकानेर), सर्वानंद सोनोवाल (दिब्रुगड), जितेंद्र सिंह (उधमपूर), काँग्रेस नेते गौरव गोगोई (जोरहाट), माजी मंत्री ए. राजा (निलगिरी), कार्ती चिदंबरम (शिवगंगा), चिराग पासवान (हाजीपूर) या दिग्गजांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार आहे.

महाराष्ट्रातील एकूण पाच मतदारसंघांत मतदान पार पडेल त्यात नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली- चिमूर व भंडारा- गोंदिया या मतदारसंघांचा समावेश आहे. अरुणाचल प्रदेश व सिक्कीमधील ९२ विधानसभा मतदारसंघांमध्येही मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वेगळा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT