INDIA Alliance Mumbai Meeting  esaka
देश

INDIA Alliance : 'इंडिया' आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर; आता 25-26 ऑगस्ट नाही, तर 'या' तारखेला होणार बैठक!

16 ऑगस्ट रोजी शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार

सकाळ डिजिटल टीम

इंडिया आघाडीची (INDIA Alliance) मुंबईतील (Mumbai) बैठक लांबणीवर गेली आहे.

INDIA Alliance Mumbai Meeting : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी एकजूट केली आहे. या आघाडीला INDIA असं नाव देण्यात आलंय.

विरोधी पक्षांच्या नेत्यांची पहिली बैठक पाटणा व दुसरी बैठक बंगळुरूमध्ये पार पडल्यानंतर आता विरोधी आघाडीची पुढची बैठक मुंबईत होणार असल्याचं स्पष्ट झालंय. या बैठकीच्या तारखेत बदल झाल्याची माहिती समोर येत आहे.

त्यामुळं इंडिया आघाडीची (INDIA Alliance) मुंबईतील (Mumbai) बैठक लांबणीवर गेली आहे. आता इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार आहे. आधी ही बैठक 25 आणि 26 ऑगस्टला ठरली होती. मात्र, आता ही बैठक ऑगस्ट महिन्याच्या शेवटी होणार असल्याचं कळतंय. मुंबईतील हयात हॉटेल इथं ही बैठक पार पडणार आहे.

दरम्यान, 16 ऑगस्ट रोजी शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं 25 आणि 26 ऑगस्ट रोजी शरद पवार मुंबईत उपलब्ध असू शकणार नाहीत, असं म्हटलं जात आहे. त्यामुळं विरोधी पक्षांची ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला आव्हान देण्यासाठी 26 पक्षांनी मिळून इंडिया आघाडीची स्थापना केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT