pm modi or mamata banerjee Sakal
देश

Loksabha Election Result : ममतांच्या बालेकिल्ल्यात भाजपची आघाडी

लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये भाजपची हार झाली असली तरी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपने चांगली कामगिरी केली आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

कोलकता - लोकसभा निवडणुकीत पश्‍चिम बंगालमध्ये भाजपची हार झाली असली तरी मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भवानीपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपने चांगली कामगिरी केली आहे. या मतदारसंघात तृणमूल काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला भाजपच्या उमेदवारापेक्षा केवळ आठ हजार २९७ मते जास्त पडली आहेत.

दक्षिण कोलकता लोकसभा मतदारसंघात भवानीपूरचा समावेश होतो. ममता बॅनर्जी येथील आमदार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार या विधानसभा मतदारसंघातील २६९ बूथपैकी १४९ ठिकाणी भाजपला जास्त मते पडली आहेत. तसेच कोलकता महानगरपालिकेच्या आठपैकी पाच वॉर्डांमध्ये भाजपच्या मतांचे प्रमाण चांगले आहे. भवानीपूरमध्ये भाजपने मतांमधील अंतर ५० हजारांनी कमी केले आहे.

सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर विधानसभेची जागा सुमारे ५८ हजार ८३२ मतांच्या फरकाने जिंकली होती. त्यांना ७२ टक्के मते मिळविली. भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांच्याकडून नंदीग्रामची मतदारसंघातून पराभूत व्हावे लागल्याने बॅनर्जी यांना पोटनिवडणूक लढवावी लागली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT