Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha Election 2024 : दुसऱ्या टप्प्यासाठी आज ‘मतसंग्राम’; राज्यातील आठ मतदारसंघांत मतदान

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ८८ मतदारसंघांत उद्या (शुक्रवार) मतदान होणार असून राज्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशभरातील ८८ मतदारसंघांत उद्या (शुक्रवार) मतदान होणार असून राज्यात विदर्भातील पाच आणि मराठवाड्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या टप्प्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह एकूण १२१० उमेदवारांचे भवितव्य मतदानयंत्रांमध्ये बंद होणार आहे.

पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार या टप्प्यात ८९ मतदारसंघात मतदान होणार होते. परंतु मध्य प्रदेशातील बैतुल मतदारसंघातील बसपच्या उमेदवाराचे निधन झाल्याने तेथे तिसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदान होणाऱ्या ८८ मतदारसंघांमध्ये नऊ मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी तर सहा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. या टप्प्यात केरळमधील सर्व २० मतदारसंघांत मतदान पूर्ण होणार आहे.

याशिवाय आसाम (५), बिहार (५), छत्तीसगड (३), कर्नाटक (१४), मध्य प्रदेश (६), महाराष्ट्र (८), मणिपूर (१), राजस्थान (१३), त्रिपुरा (१), उत्तर प्रदेश (८), पश्चिम बंगाल (३) व जम्मू व काश्मीर (१) या राज्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान होत असून या टप्प्यानंतर राज्यातील ४८ मतदारसंघांपैकी १३ मतदारसंघांतील मतदान संपलेले असेल.

देशातील प्रमुख उमेदवार

ओम बिर्ला (कोटा), राहुल गांधी (वायनाड), गजेंद्रसिंह शेखावत (जोधपूर), व्ही. मुरलीधरन (अट्टिंगल), सी. पी. जोशी (भिलवारा), हेमा मालिनी (मथुरा), अरुण गोविल (मेरठ), एच. डी. कुमारस्वामी (मंड्या), तेजस्वी सूर्या (बंगळूर दक्षिण), शशी थरूर व राजीव चंद्रशेखर (तिरुवनंतपुरम), भूपेश बघेल (राजनांदगाव), पप्पू यादव (पूर्णिया), के. सी. वेणुगोपाल (अलापुझ्झा), दानिश अली (अमरोहा)

उष्णतेसाठी अधिकाऱ्यांना सूचना

पहिल्या टप्प्यात कमी मतदान झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात मतदानाचा टक्का सुधारावा, यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने संबंधित राज्यातील अधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स घेत सूचना केल्या. उष्णतेची लाट असल्यास मतदान केंद्रांवर काय उपाययोजना करायला हव्यात, याबाबत मार्गदर्शनही केले.

केरळमध्ये सर्व २० जागांवर मतदान

तिरुअनंतपुरम : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केरळमधील सर्व २० जागांवर निवडणूक होत आहे. या जागांसाठी १९४ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी केवळ २५ महिला आहेत. राज्यात एकूण दोन कोटी ७७ लाखांहून अधिक मतदार असून पाच लाखांहून अधिक जण प्रथम मतदार आहेत.

मतदारांच्या बोटांना शाई लावण्यासाठी एकूण ६३ हजार १०० बाटल्यांचा वापर होणार आहे. वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्यासमोर भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुरेंद्रन आणि माकपच्या नेत्या ॲनी राजा यांचे आव्हान असून तिरुअनंतपुरम येथे काँग्रेसच्या शशी थरुर यांच्यासमोर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांचे आव्हान आहे.

प्रमुख उमेदवार

  • प्रकाश आंबेडकर (अकोला)

  • नवनीत राणा (अमरावती)

  • रविकांत तुपकर, प्रतापराव जाधव, नरेंद्र खेडकर (तिघेही बुलडाणा)

  • रामदास तडस (वर्धा)

राज्यातील मतदान

  • विदर्भ : अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, बुलडाणा

  • मराठवाडा : परभणी, हिंगोली व नांदेड

  • एकूण उमेदवार : २२३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Munde Midnight Raid and First Posting Revelations : आयुक्त तुकाराम मुंढेंचा खळबळजनक गौप्यस्फोट; २००७ मधील पहिल्याच पोस्टिंगच्या वेळी मध्यरात्रीच्या धाडीचा थरारक किस्सा अन् 'त्या' फोन कॉलबद्दल केला खुलासा

Pimpri Chinchwad fire brigade : गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या ७० घटना; यंदा पिंपरी-चिंचवडमध्ये २० अग्निशमन वाहने सज्ज, २२ संवेदनशील ठिकाणांवर २४ तास लक्ष

बॉस असावा तर असा! दिवाळीला प्रत्येकाला दिला १ लाखांचा बोनस, कर्मचारी भावुक; Video Viral

Latest Marathi News Live Update: : शरद पवारांच्या भेटीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या 'सिल्वर ओक'वर जाणार; रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भेटीची मालिका सुरू

Mega Clean River Mission 2029 Deadline : "२०२९ आधी नदी पूर्ण स्वच्छ करूनच जनतेसमोर येणार!"; तब्बल ८,९४१ कोटींच्या मेगा प्लॅनची घोषणा, गृहमंत्र्यांचा मोठा संकल्प

SCROLL FOR NEXT