Loksabha Election 2024 esakal
देश

Loksabha Election 2024 : सोनिया गांधी 'या' राज्यातून लढणार लोकसभा निवडणूक?, मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभेची निडणूक लढवण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र नेमका मतदारसंघ त्यांनी सांगितला नाही.

संतोष कानडे

नवी दिल्लीः काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभेची निडणूक लढवण्याची शक्यता आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली.

प्रियंका गांधी ह्या रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. तर सोनिया गांधी ह्या तेलंगणमधून निवडणुकीला सामोऱ्या जातील. मात्र नेमक्या कोणत्या मतदारसंघातून त्या निवडणूक लढवतील, हे स्पष्ट झालेलं नाही.

सोनिया गांधी यांनी १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातील बळ्ळारी येथून भाजपच्या दिवंगत नेत्या दिवंगत सुषमा स्वराज यांचा पराभव केला होता. त्यामुळे सोनिया गांधी कर्नाटकमधून राज्यसभेची निवडणूक लढवतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

''सोनिया गांधी आगामी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत आणि त्यांना कर्नाटकमधून राज्यसभेची जागा दिली जाऊ शकते, ही सर्व माहिती खोटी आहे.. अशी कोणतीही चर्चा झालेली नाही.'' असं कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी स्पष्टीकरण दिलं.

दुसरीकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी मात्र सोनिया गांधी तेलंगणामधून लोकसभेची निवडणूक लढवू शकतात, असं विधान केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT