Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

‘व्होट जिहाद’ वरून धरले धारेवर

पीटीआय

विक्रम (बिहार) - दलित आणि मागासघटकांच्या आरक्षणावर घाला घालण्याचा ‘इंडिया’ आघाडीचा डाव असून मुस्लिम मतपेढीसाठी सध्या त्यांचा मुजरा सुरू आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील सभेत बोलताना केली. पाटण्यापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित सभेत त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले.

‘बिहारने सामाजिक न्यायाच्या लढाईला एक नवी दिशा दिली होती. आता याच मातीतून मी इंडिया आघाडीचे मनसुबे हाणून पाडण्याची घोषणा करतो आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणावर घाला घालण्याचा त्यांचा डाव आहे. ते मतपेढीच्या राजकारणाचे गुलाम असल्याने मुजरा करतच राहतील,’ असे मोदी म्हणाले.

‘इंडिया आघाडीला व्होट जिहाद करणाऱ्यांचा मोठा पाठिंबा आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारचा काही मुस्लिम समुदायांना ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा निर्णय रद्दबातल ठरविला होता,’ असे त्यांनी नमूद केले.

लाडू तयार ठेवा

भाषणात पंतप्रधानांनी मानेरच्या लाडवांचा उल्लेख केला. मानेरचे लाडू प्रसिद्ध असून ४ जूनच्या निकालासाठी ते तयार ठेवा अशी सूचना त्यांनी केली. यावेळी त्यांनी लालूप्रसाद यांच्यावरही टीका केली. एलईडीच्या जमान्यात ती मंडळी कंदिलाकडे जात आहेत. या कंदिलाचा उजेड यादवांच्या घरात पडेल पण बिहार अंधाराच्या छायेत बुडेल अशी टीका त्यांनी केली. पाटलीपुत्र मतदारसंघात मिसा भारती या सलग तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत.

ते संगीत खुर्ची करतील

‘आज भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करू शकेल अशा पंतप्रधानांची आवश्यकता आहे पण इंडिया आघाडीवाले मात्र या सर्वोच्च पदासाठी संगीत खुर्चीचा खेळ आयोजित करण्याच्या विचारात आहे. काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आणि समाजवादी पक्षातील सर्वच नेत्यांना एकदा तरी पंतप्रधानपद भूषवायचे आहे.

पुढील पाच वर्षांमध्ये आम्ही बिहारचा चौफेर विकास घडवून आणू. चोवीस तास वीज पुरवठा करण्याबरोबरच गरिबांना पक्की घरे देण्यात येतील तसेच त्यांना मोफत रेशन धान्य देखील दिले जाईल,’ असे मोदी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT