Basavaraj Bommai sakal
देश

Basavaraj Bommai : लोकसभा निवडणुकीत भाजप दक्षिणेतही जास्त जागा जिंकणार

‘लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजप २५ पेक्षा जास्त जागा जिंकू. तसेच दक्षिण भारतातही जास्त जागा जिंकू’ असा विश्‍वास कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला.

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर - ‘लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजप २५ पेक्षा जास्त जागा जिंकू. तसेच दक्षिण भारतातही जास्त जागा जिंकू’ असा विश्‍वास कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी व्यक्त केला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे निकटवर्तीय निवृत्त केएएस अधिकारी रुद्रय्या यांनी बुधवारी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. या कार्यक्रमामध्ये बोम्मई बोलत होते.

भाजप कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत भाजप केवळ राज्यातच नव्हे, तर शेजारच्या तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणमध्येही अधिक जागा जिंकेल. अनुसूचित जातींचा काँग्रेसकडून भ्रमनिरास झाला आहे. काँग्रेसने या समाजाचे आरक्षण वाढवले ​​नाही. मी मुख्यमंत्री असताना ‘एससी’, ‘एसटी’ आरक्षण वाढवले ​​होते.

‘इंडिया’ आघाडीबाबत भ्रमनिरास

‘विरोधकांची ‘इंडिया’ आघाडी पुढील काळात टिकणार नाही. या आघाडीत काँग्रेस पक्ष वरचढ ठरत असल्याने, इतर पक्ष युतीतून बाहेर पडत आहेत. ममता बॅनर्जी यांनी याआधीच सांगितले आहे की, त्यांचा आघाडीबाबत भ्रमनिरास झाला आहे,’ असे बोम्मई यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 2nd T20I : वैभव सूर्यवंशी IN... पण, ना संजू OUT, ना अभिषेक..! भारताच्या Playing XI मध्ये दोन खेळाडूंचे पदार्पण होणार

Mobile Restart : मोबाईल कधी रिस्टार्ट करावा अन् कधी नाही? आत्ताच घ्या जाणून नाहीतर फोन होऊ शकतो खराब

एकाच दिवशी ३ दिग्गज क्रिकेटपटूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली; रिटायरमेंट सामन्यात अश्रू अनावर, पाहा व्हिडिओ

Thane Crime: क्लासला जातो सांगून ५ जण घराबाहेर पडले, लखनौला पोहोचल्याचे समजल्या नंतर...; मुंब्य्रात नेमकं काय घडलं?

Pune Accident: राजगड सहलीवर काळाचा घाला! पाबे घाटात ट्रॅव्हल बस ४० फूट दरीत; दोन ठार, 19 जण जखमी..

SCROLL FOR NEXT