Yogi Adityanath sakal
देश

Yogi Adityanath : पीछेहाटीचे खापर योगींच्या माथ्यावर?

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे.

शरत प्रधान

लखनौ - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा धक्का बसला आहे. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला येथे ८० पैकी ६२ जागांवर विजय मिळाला होता. यावेळी ही संख्या ३७ वर येत भाजपची राज्यात पीछेहाट झाली. या पीछेहाटीचे खापर फोडण्यासाठी भाजपश्रेष्ठींकडून शोध सुरू असल्याचे बोलले जात आहे.

लोकसभा निवडणुकीबाबतचे उत्तर प्रदेशातील सर्व निर्णय हे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून घेतले जात होते हे सर्वांना माहीत आहे. इतकेच नव्हे तर उमेदवारांची नावे निश्‍चित करण्याबाबत योगी आदित्यनाथ यांचे मत विचारत घेतले गेले नसून काही ठिकाणी दिलेल्या उमेदवारांना त्यांचा विरोध असूनही पक्षनेतृत्वाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे मानले जाते.

असे असूनही आदित्यनाथांवर दोषारोप करण्यासाठी पद्धतशीरपणे काही माध्यमांचा वापर केला जात असल्याचे बोलले जात आहे. या माध्यमांवर पंतप्रधान कार्यालयातील व गृहमंत्र्यांच्या कार्यालयातील काही व्यक्तींचा प्रभाव आहे.

हिंदुत्ववादी नेतृत्व अशी ओळख निर्माण करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद भूषविणाऱ्या आदित्यनाथांवर लोकसभेतील पीछेहाटीचे खापर फोडत त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न होत असल्याचे भाजपमधीलही अनेकजण नाकारत नाहीयेत.

त्यांची वाढती लोकप्रियता हा पक्षातील काहींसाठी अडसर ठरत आहे का, हा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. इतकेच नव्हे तर पक्षातील त्यांच्या विरोधी गटाने आदित्यनाथांनी पक्षाचे नुकसान केल्याचाही आरोप केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशातील भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र आहे.

संघाचा पाठिंबा

पक्षांतर्गत विरोधाच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यनाथांना संघातील एका मोठ्या गटाचा मात्र पाठिंबा असल्याचे समजते. रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचा नुकताच झालेला गोरखपूर दौरा या अनुषंगाने चर्चेचा विषय ठरला. येथे आदित्यनाथ व भागवत यांची बैठक होणार असल्याचे बोलले जात होते, मात्र ही बैठक होऊ शकली नाही. उत्तर प्रदेशातील भाजपमधील हा सुप्त संघर्ष हाताळण्यात संघाची भूमिका नेमकी काय असेल याकडे राजकीय विश्‍लेषकांसह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT