Rahul gandhi and Akhilesh Yadav in Bharat Jodo Yatra sakal
देश

Bharat Jodo Yatra : भाजप हटवा, देश वाचवा - अखिलेश यादव

लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काँग्रेसबरोबर आघाडी निश्‍चित झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग घेतला.

वृत्तसंस्था

आग्रा - लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काँग्रेसबरोबर आघाडी निश्‍चित झाल्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आज काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग घेतला. लोकशाही वाचविणे हेच आगामी निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडीसमोरील सर्वांत मोठे आव्हान आहे, असे अखिलेश यावेळी म्हणाले. ‘भाजप हटवा, देश वाचवा’ अशी घोषणाही त्यांनी यावेळी दिली.

उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी १७ जागा काँग्रेस लढविणार असून उर्वरित जागा समाजवादी पक्ष आणि इतर मित्रपक्ष लढविणार आहेत. काँग्रेस आणि ‘सप’मधील जागावाटपाचा तिढा सुटल्यामुळे अखिलेश यादव यांनी आज आग्रा येथे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभागी झाले. यावेळी त्यांनी जमलेल्या जनतेशी संवादही साधला.

‘भाजप हटवा, देश वाचवा’ अशी घोषणा देऊन अखिलेश यादव म्हणाले, ‘लोकशाही आणि राज्यघटना यांचे संरक्षण करणे, हे सर्व पक्षांसमोरील मोठे आव्हान आहे. भाजपने धुळीला मिळविलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न इंडिया आघाडीला पूर्ण करायचे आहे.’

राहुल गांधी यांनीही भाषण केले. ते म्हणाले, ‘कन्याकुमारी ते काश्‍मीर या यात्रेवेळी एकाने मला सांगितले होते की, तुम्ही द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान सुरू करत आहात. अखिलेश यादव आणि प्रियांका गांधी यांच्याबरोबरीने यावेळीही मला तेच करायचे आहे.’

प्रियांका गांधींचाही सहभाग

अलिगड येथे काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी भारत जोडो न्याय यात्रेत सहभाग घेतला. भाजपवर टीका करताना त्या म्हणाल्या, ‘युवक, पोलिस आणि विद्यार्थी यांच्याशी भाजपचा संपर्क तुटत चालला आहे. देशात बेरोजगारी, महागाईचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. देशात अनेक मोठ्या परिषदा झाल्या त्यामुळे भारताचा जगभरात आदर वाढला, हे आम्हालाही मान्य आहे. मात्र, युवक, पोलिस आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाचा आणि देशाचा काही संबंध नाही का?’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 4th T20I : ९ सिक्स अन् ४ फोर... शे होपचं पुन्हा वादळी शतक अन् ३ मोठे विक्रम; गेल-लुईस सगळेच मागे पडले

Graduate Teachers Constituency Election : पदवीधर, शिक्षक निवडणुकीकडे विशेष लक्ष द्या; फडणवीसांच्या नगरसेवक आमदारांना सूचना

CM Devendra Fadnavis : पाच हजार ही आत्तापर्यंतची सर्वाधिक मदत; यापूर्वी एक हजार ते पंधराशे रुपये मिळत असत

Sugarcane Rate Agitation : ऊसदराचे आंदोलन होणार तीव्र; राजू शेट्टी उद्या येणार कृष्णा कारखान्यावर

Opposition Petition: निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी; राहुल गांधींच्या याचिकेतले नेमके मुद्दे कोणते?

SCROLL FOR NEXT