

Delimitation Bill Opposition Congress Leaders Meeting rahul gandhi mallikarjun kharge sonia gandhi
esakal
Congress Leaders Meeting : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, विरोधकांमध्ये या मुद्द्यावर एकजूट निर्माण करण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच सोनिया गांधी या देखील खरगे यांच्यासोबत शरद पवारांची भेट घेण्याची शक्यता आहे. डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर या भेटी राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.