Amit Shah and chirag paswan 
देश

Amit Shah : चिराग पासवान यांनी घेतली अमित शहांची भेट; NDA मध्ये सामील होण्यासाठी ठेवली 'ही' अट

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : लोक जनशक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामविलास पासवान यांनी सोमवारी दिल्ली गाठून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. एनडीएच्या मंगळवारी होणाऱ्या बैठकीपूर्वी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

चिराग पासवान यांना एनडीएच्या बैठकीला येण्याचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र त्यासाठी चिराग पासवान यांनी काही अटी घातल्या आहेत. 2019 प्रमाणे लोकसभेच्या सहा आणि राज्यसभेची एक जागा द्याव्या, अशी मागणी चिराग पासवान यांनी केली.

अमित शहा आणि चिराग पासवान यांच्यात सुमारे 15 मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर लोजप (रामविलास)चे बिहार अध्यक्ष राजू तिवारी म्हणाले, "चर्चा खूप चांगल्या वातावरणात झाली. चर्चा सकारात्मक वातावरणात झाली. विविध मुद्द्यांवर चर्चा झाली."

हाजीपूर जागेबाबत राजू तिवारी म्हणाले की, चिराग पासवान यांनी यापूर्वीच हाजीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले आहे. पशुपती पारस यांच्या दाव्यावर ते म्हणाले, "कोण काय म्हणतंय? याच्याशी आमचा काहीही संबंध नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Kabaddi Tournament: अमर हिंदच्या विजयात सेजल कांबळे चमकली; जय भारत, यश, विश्वशांतीसह मुंबई पोस्टलचीही आगेकूच

आजचे राशिभविष्य - 16 ऑक्टोबर 2026

Navratri Upvas Recipe: बटाटा-खोबऱ्याचे चटपटीत कॉम्बिनेशन! नवरात्रीच्या उपवासाला बनवा खमंग, कुरकुरीत फराळी पॅटिस...

सीजेपीच्या 'तिरंगा मार्च'ला आडकाठी! दिल्लीतील सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा निर्णय; अभिजित दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, '100 ठिकाणी...'

Drunk and Driver : कोथरूडमध्ये ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’चा थरार; तीन ते चार जण किरकोळ जखमी, २४ वर्षीय कारचालक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

SCROLL FOR NEXT