ममता बॅनर्जी Sakal
देश

कोलकत्ता : शत्रुघ्न सिन्हा, सुप्रियो यांना तृणमूल काँग्रेसची उमेदवारी

लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हा यांना आज उमेदवारी जाहीर केली.

सकाळ वृत्तसेवा

कोलकता : पश्‍चिम बंगालमधील असनसोल लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी तृणमूल काँग्रेसने शत्रुघ्न सिन्हा यांना आज उमेदवारी जाहीर केली. तसेच बालीगंज विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे माजी नेते व माजी मंत्री बाबूल सुप्रियो यांना तृणमूलने उमेदवारी दिली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून या नावांची घोषणा केली. ‘‘अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोलमधून लोकसभा पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील हे जाहीर करताना आनंद होत आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री आणि प्रसिद्ध गायक बाबुल सुप्रियो हे बालीगंज येथून विधानसभा पोटनिवडणूक लढवणार आहेत. जय हिंद, जय बांगला, जय माँ-मांटी- मानुष!, ’’ असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.

भाजपच्या तिकिटावर दोन वेळा निवडून आलेले बाबूल सुप्रियो यांनी राजीनामा दिल्याने असनसोल लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा देतानाच भाजपमधून बाहेरपडून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सुरुवातीला त्यांनी आपण आता राजकारणापासून दूर जात असल्याचे म्हटले होते. नंतर मात्र त्यांनी तृणमूलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. सुप्रियो हे गेल्या लोकसभा निवडणुकीत असनसोल मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यांची केंद्रीय मंत्रिपदीही वर्णी लागली होती. परंतु, २०२१मधील केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना वगळण्यात आले. त्यामुळे नाराज होऊन त्यांनी पक्ष सोडल्याचे बोलले जाते.

शत्रुघ्न सिन्हा हे २००९ आणि २०१४ या दोन लोकसभा निवडणुकीत बिहारमधील पाटणा साहिब मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका करत भाजपमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता व ते काँग्रेसमध्ये दाखल झाले होते. शुत्रघ्न सिन्हा यांनी २०१९मधील लोकसभेची निवडणूक पाटणा साहिब मतदारसंघातूनच काँग्रेसच्या तिकिटावर लढविली होती. मात्र त्यांचा पराभव झाला. आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT