love story 
देश

Love Story: 2 मुलांचा बाप अन् ४ मुलांच्या आईचं भन्नाट 'लव'; सोबत व्हिडीओ बनवले अन्...

सकाळ डिजिटल टीम

राजस्थानच्या बाडमेरमध्ये दोन मुलांचे वडील आणि चार मुलांची आई यांच्यात दीर्घकाळ प्रेमप्रकरण सुरू होतं. प्रेमप्रकरण इतकं घट्ट झालं की आधी दोघांनी एकत्र जेवण केलं आणि नंतर काही व्हिडिओ बनवले. त्यानंतर दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली. (love affair mother of 4 children and father of two children )

बाडमेर जिल्ह्यातील अति गावात ही घटना घडली आहे. माधाराम हा 2 मुलांचा पिता आहे. प्रेमप्रकरणामुळे माधारामचे पत्नीशी भांडण होत होते. एक दिवस आधीच पत्नी मुलांना घेऊन पीहरला गेली होती. तर, माधारामचे जिच्यासोबत प्रेमसंबंध होते, ती मगी चार मुलांची आई होती. दोन दिवसांपूर्वी ती अचानक घरातून बेपत्ता झाली.

मगीच्या पतीने पोलिस पत्नी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. आता माधाराम आणि मगी या दोघांचेही मृतदेह माधारामच्या घरात एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत सापडले आहेत. मगी आणि माधाराम एका लग्न समारंभात एकमेकांना भेटले होते.

दोघांचेही प्रेमसंबंध असल्याची माहिती दोघांच्या कुटुंबीयांना मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये रोज भांडणे होत होती. मगीच्या घरी भांडण झालं, म्हणून ती पळून जाऊन माधारामच्या घरी आली. जिथे दोघांनीही माधारामच्या घरातील खोलीत एकाच दोरीला लटकून गळफास घेऊन आत्महत्या केली.

माधाराम आणि मगी यांचा कुठेही शोध लागत नसल्याने दोघेही मिळून गेल्याची चर्चा रंगली होती. अशा परिस्थितीत माधाराम यांच्या कुटुंबातील लोकांनीही इकडे तिकडे दोघांचा शोध घेतला, मात्र जेव्हा ते माधारामच्या घरी पोहोचले तेव्हा दोघांचेही मृतदेह एका खोलीत एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले, त्यानंतर पोलिसांना माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT