Assam Girl inject her HIV positive blood in her body esakal
देश

प्रेम की वेडेपणा? १५ वर्षीय मुलीने HIV बाधित बॉयफ्रेंडचं ब्लड स्वत:च्या शरीरात सोडलं

मुलीने प्रेम सिद्ध करण्यासाठी चक्क तिच्या HIV बाधित बॉयफ्रेंडचं रक्त स्वत:च्या शरीरात इंजेक्ट करून घेतलं.

सकाळ डिजिटल टीम

'प्रेमाला सीमा नसते' असं म्हणतात पण ही सीमा ओलांडून जर का कोणी मुर्खपणाचा कळस करत असेल तर हे फार गंभीर आहे. अशीच एक घटना आसाममध्ये घडली आहे. आसाममधील एका अल्पवयीन मुलीने प्रेम सिद्ध करण्यासाठी चक्क तिच्या HIV बाधित बॉयफ्रेंडचं रक्त स्वत:च्या शरीरात इंजेक्ट करून घेतलं.

हे प्रकरण आसाममधील सुआलकुची जिल्ह्यातील आहे. स्वत:ला प्रियकराच्या प्रेमात पडल्याचा दावा करणाऱ्या या तरुणीने प्रेमासाठी स्वत:चा जीव धोक्यात टाकत हा मुर्खपणा केलाय. तिने तिच्या बॉयफ्रेंडचे HIV बाधित रक्त तिच्या शरीरात टोचून घेतले.

फेसबुकवरून दोघांची मैत्री झाली होती

आसाममधील या १५ वर्षीय मुलीची HIV बाधित मुलाशी फेसबुकवरून मैत्री झाली होती. नंतर ही मैत्री प्रेमात बदलली. तीन वर्षांच्या प्रेमप्रकरणानंतर या दोघांत प्रेंमाचं नातं एवढं घट्ट झालं की ते एकमेकांपासून वेगळे राहाण्याची कल्पना करू शकत नव्हते. मात्र त्यासाठी त्याचं HIV बाधित रक्त स्वत:च्या शरीरात टोचून घेणे हा प्रकार फार गंभीर आहे. या प्रकरणानंतर आसाम भागात अल्पवयीन मुलीच्या वागण्यानं तणावपूर्वक वातावरण निर्माण झालंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belagaum House Fire : बेळगाव हादरले! गणेशोत्सवाच्या रात्री काळाचा घाला; घरातील आगीत एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Mumbai-Konkan Ro-Ro Service : कोकणवासियांसाठी खूशखबर! मुंबई ते वेंगुर्ला रो-रो सेवा पुन्हा सुरू होणार, प्रवासाचा वेळ वाचणार, तिकीट दरही आवाक्यात?

India Nepal Power Supply : भारत नेपाळला दररोज १८ तास वीज पुरवणार, जलप्रलयानंतर मदतीचा हात

Latest Marathi News Update : दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव, संजय राऊत काय म्हणाले

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

SCROLL FOR NEXT