Uttar Pradesh Love Story esakal
देश

40 वर्षाच्या प्रियकरासोबत 24 वर्षाच्या मुलीनं पळून जाऊन केलं लग्न

सकाळ डिजिटल टीम

दोघांनाही आयुष्यभर सोबत राहायचं आहे, पण लग्नानंतर नातेवाईक दोघांच्याही जीवाचे शत्रू बनलेत.

'प्रेम' हे एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीशी जोडतं. यात ना वयाला महत्त्व आहे, ना कोणतंही बंधन. असाच काहीसा प्रकार उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बरेलीत (Bareilly) घडलाय. एका 40 वर्षीय व्यक्तीचं 24 वर्षीय तरुणीवर प्रेम झालं (Love Story) आणि दोघांनी घरातून पळून जाऊन लग्न केलंय. आता दोघांनीही पोलिसांकडं संरक्षणाची मागणीय केलीय. लग्नानंतर हे प्रेमीयुगल वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचलं आणि त्यांनी पोलिसांकडं संरक्षण देण्याची मागणी केलीय. तसेच मुलीचे कुटुंबीय या लग्नाला विरोध करत असून आमच्या जीवाला धोका असल्याचं त्यांनी सांगितलंय.

बरेलीच्या फतेहगंज पश्चिम पोलीस स्टेशन (Fatehganj West Police Station) परिसरात राहणाऱ्या 40 वर्षीय जयवरी सिंहचे शेजारी राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीसोबत गेल्या 12 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांचं घर शेजारी असल्यानं दोघांची भेट होऊ लागली आणि या भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. प्रेयसीनं पोलिसांना सांगितलं की, जेव्हा ती प्रेमात पडली तेव्हा ती केवळ 12 वर्षांची होती.

प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न करण्याचा बेत आखला आणि 25 जानेवारी रोजी घरातून पळून जाऊन लग्न केलं. दोघांनाही आयुष्यभर सोबत राहायचं आहे, पण लग्नानंतर नातेवाईक दोघांच्याही जीवाचे शत्रू झाले आहेत. प्रेयसीनं वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्यालयाला लेखी तक्रार पत्र दिलं असून आपल्या जीवाला धोका असल्याचं कारण देत संरक्षण देण्याची मागणी केलीय. या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधीक्षक रोहित सिंह सजवान म्हणाले, हे प्रकरण मिटवण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलावलं जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT